Chief Minister Youth Training Mission: मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण अभियान हे ११ महिन्यांसाठीच!

Chief-Minister-Youth-Training : मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण अभियान हे ११ महिन्यांसाठीच!

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणाच्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर त्यांनी आपली भूमिका मांडली. त्यामध्ये, टीपू सुलताना, दावोस करार, विरोधकांचे आरोप, एबीसीची रेड, नरहरी झिरवाळ प्रकरण, मराठी शाळा, हिंदी-मराठी भाषेसह अनेक विषयांवर चर्चा केली. तसेच, सभागृहात आमदार भास्कर जाधव यांनी उपस्थित केलेल्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण अभियानासंदर्भातील प्रश्नावरही उत्तर दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी आपल्या भाषणात विरोधी पक्षांना लक्ष्य केले. विरोधी पक्ष हा भ्रमित आणि संभ्रमित आहे, असे दिसते. माझी त्यांना सूचना आहे की, भ्रमात राहून धावण्यापेक्षा संभ्रमातून बाहेर पडण्यासाठी शांतपणे विचार करुन मुद्दे मांडले पाहिजेत. जेणेकरुन महाराष्ट्राच्या हितात तुमचे योगदान वाढेल. ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था, विकसित भारत, महाराष्ट्राची वाटचाल, दावोस करारासंदर्भातही स्पष्टीकरण दिले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण अभियान हे 11 महिन्यांसाठी असणार ते आधीच घोषित केले होते, इतरत्र नोकरीला जाताना उमेदवारांना फायदा व्हावा यासाठी त्यांना अनुभवपत्र देण्यात आले होते. प्रशिक्षणार्थी युवकांना पर्मनंट करणार हे सांगितल्याचे भास्कर जाधव म्हणाले, तसं रेकॉर्ड आमच्याकडे आहे असंही ते बोलले. मात्र, तसे रेकॉर्ड असेल तर पाठवून द्या .

युवा प्रशिक्षण युवकांना पर्मनंट करतो हे सांगणाऱ्या मंत्र्याचा अहवालच राज्यपालांकडे पाठवतो, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भास्कर जाधवांचे मत खोडून काढले. चांगल्याला चांगलं म्हणायला शिका. विरोधी पक्षाने चहापानपासून राजकारण करायला सुरुवात केली. हम नही सुधरेंगे असं ते आहे. ते म्हणाले, यांची काळी चहा-कॉफी पिणार नाही. आम्ही त्यांचे काळे धंदे बाहेर काढ, ज्यांनी काळे धंदे केले त्यांना लोकांनी घरी बसवले आणि आम्ही तुम्हाला काळा चहा पाजला नसता. आम्ही गोकुळ दुधाचा चहा पाजला असता, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

देवाभाऊंमुळेच दोन भाऊ एकत्र (Chief-Minister-Youth-Training)

शाळेत हिंदी भाषेच्या सक्तीसंदर्भाने राज्याने काय स्विकारले ते पाहा, मंत्रिमंडळापेक्षा मोठे कुणीही नाही, त्याच मंत्रिमंडळाने शिफारस स्विकारली. ही शिफारस उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने स्विकारली. विरोधकांची स्थिती म्हणजे करून करून भागले आणि देवपूजेला लागले, तुमच्यासोबत राजसाहेब पण नादी लागले, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंनाही टोला लगावला. तसेच, मी रेकॉर्डवर आणू इच्छितो की, दोन भाऊ एकत्र आल्याचे श्रेय देवेंद्र फडणवीसला आहे, असेही ते म्हणाले.

Social Media