शासकीय मुद्रणालय चर्नीरोड : येथे नव्या छपाई यंत्राची पाहणी शासकीय मुद्रणालय,
चर्नीरोड येथे नव्याने कार्यान्वित करण्यात आलेल्या अत्याधुनिक छपाई यंत्राची माहिती व्यवस्थापक महोदयांकडून पत्रकार मित्रांना देण्यात आली.
या यंत्राच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे छपाईची गुणवत्ता, वेग आणि कार्यक्षमता अधिक वाढणार असून शासकीय मुद्रणाच्या कामकाजाला
निश्चितच गती मिळणार आहे. यावेळी व्यवस्थापकांनी नव्या यंत्राची वैशिष्ट्ये, त्याची कार्यपद्धती तसेच शासकीय मुद्रणालयाच्या
कामकाजात होणारे फायदे याबाबत सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी पत्रकार मित्रांनीही नव्या यंत्राची पाहणी करून विविध बाबींची
माहिती जाणून घेतली.




हेही वाचा:-मराठा,आकाशवाणी ते सकाळ ; साठ दशकांची वसंतराव देशपांडे यांची वैभवशाली पत्रकारिता !