मुलांचे वजन व उंची वाढवणारे पदार्थ

Foods-increase-weight-height : केळी – कॅलरीचे प्रमाण आणि शुगर जास्त असते. त्यामुळे मुलांचे वजन लवकर वाढते. (मुलांना सतत कफ व सर्दी च्या तक्रारी नसल्यास)

साय असलेले दूध – यामध्ये प्रोटीन आणि हाय फॅट असते. त्यामुळे मुलांचे वजन लवकर वाढते.

भात – यामध्ये कार्बोहायड्रेट अधिक असते. ते वजन वाढवण्यात फायदेशीर ठरते.

चिकू – यामध्ये कॅलरी आणि शुगर अधिक असते. ते बॉडी फॅट वाढवण्यास मदत करते.

मासे – यामधील ओमेगा ३ फॅटी ॲसिड्स, प्रोटीन मुलांच्या योग्य वाढीसाठी चांगले आहे.

सोयाबीन – सोयाबीन आणि त्यापासून तयार पदार्थांमध्ये प्रोटीन असते. यामुळे मुलांचे वजन वाढते.

डाळ – यामध्ये प्रोटीन अधिक असते. ते मुलांचे वजन वाढवण्यात फायदेशीर ठरते.

चीज – यामधील भरपूर प्रोटीन(Protein) आणि फॅट मुलांचे वजन वाढवण्यासाठी चांगले आहे.

अंडी- प्रोटीनयुक्त मुलांना दररोज खाऊ घातल्याने त्यांचे वजन लवकर वाढेल.

दही – यामध्ये व्हिटॅमिन डी (Vitamin D)आणि कॅल्शियम(Calcium) असते. त्याचा मुलांची उंची वाढवण्यात फायदा होतो.

संत्री – यामधील व्हिटॅमिन सीमुळे मुले ऊर्जावान राहतात आणि त्यांनी कमजोरीही दूर होते.

डाळिंब – यामधील अँटीऑक्सिडंट्स(Antioxidants) बुद्धी तल्लख करण्यामध्ये मदत करतात.

पालक – यामधील लोह, कॅल्शियममुळे मुलांची उंची वाढवण्यात मदत होते.

पनीर – यातील फायबर, फॉस्फरसमुळे पचन चांगले होते व दात मजबूत राहतात.Foods-increase-weight-height

Social Media