बलिदानी अनामवीरांना पितृपक्षात तर्पण

अनामवीरांना तर्पण : यंदाचा ‘तर्पण – अनामवीरांकरिता’ कार्यक्रम रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी अमर जवान स्मारक,अजनी, नागपूर येथे पार पडला.

नागपूर : देशाच्या सीमेचे रक्षण करताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या आणि विविध कारणांमुळे ज्यांचे पार्थिवही त्यांच्या

कुटुंबीयांना मिळू शकले नाही, अशा अनामवीरांच्या स्मृतींना पितृपक्षात तर्पण अर्पण करण्याची आगळीवेगळी

परंपरा माजी वायुसैनिक कल्याण संघटना (ईवान), नागपूर यांच्यावतीने मागील सात वर्षांपासून जपली जात आहे.

अनामवीरांना-तर्पण
बलिदानी अनामवीरांना पितृपक्षात तर्पण

अनामवीरांना तर्पण : ईवानतर्फे मागील ७ वर्षांपासून आगळीवेगळी परंपरा

याच उपक्रमांतर्गत यंदाचा ‘तर्पण – अनामवीरांकरिता’ कार्यक्रम रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी अमर

जवान स्मारक, अजनी, नागपूर येथे भावपूर्ण वातावरणात पार पडला.

भारत मातेचे शूर सैनिक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देशाच्या सीमांचे रक्षण करीत असतात. विशेषतः सियाचिन

ग्लेशियरसारख्या अत्यंत दुर्गम व गोठवून टाकणाऱ्या वातावरणात बर्फीली वादळे, हिमस्खलन (Avalanche)

आणि इतर नैसर्गिक संकटांचा सामना करताना अनेक जवानांनी कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान दिले आहे.

काही दुर्दैवी प्रसंगी बलिदान दिलेल्या जवानांचे पार्थिवही मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या अंतिम संस्काराची प्रक्रिया पूर्ण

होऊ शकत नाही. तसेच युद्धाच्या काळात काही सैनिक बेपत्ता झाले असून त्यांच्या मृत्यूची अधिकृत बातमीही त्यांच्या

आप्तेष्टांपर्यंत पोहोचू शकली नाही. अशा वीर जवानांना ‘अनामवीर’ म्हणून स्मरणात ठेवून त्यांच्या आत्म्याला शांती

लाभावी, या भावनेतून ईवानतर्फे हा उपक्रम राबविला जात आहे.

अमर जवान स्मारक, अजनी, नागपूर
देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांना श्रद्धांजली

देशासाठी बलिदान देणाऱ्या प्रत्येक ज्ञात-अज्ञात वीर जवानाला शतशः नमन!

कार्यक्रमात गुरुजी श्री. चंद्रशेखर चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनामवीरांसाठी विधिवत तर्पण अर्पण करण्यात

आले. यावेळी उपस्थितांनी या वीरांच्या पवित्र आत्म्याला शांती लाभावी यासाठी सामूहिक प्रार्थना करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

या अनोख्या उपक्रमाला नागपूरमधील माजी सैनिक तसेच अजनी परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला.

अमर जवान स्मारक, अजनी, नागपूर
देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांना श्रद्धांजली

कार्यक्रमास ब्रिगेडियर सुनील गावपांडे (निवृत्त), ईवानचे कार्याध्यक्ष महेश अंबोकर, सचिव अजय गाढवे तसेच

ईवानचे पदाधिकारी सुभाष भुसारी, गुरुदत्त खातखेडे, चंद्रशेखर कुलकर्णी, विलास अहेर, राजू धांडे, श्रीकांत

गंगाथडे, सुधाकर सारवे, प्रमोद माकोडे, विवेक समर्थ, प्रशांत नांदरुणकर, मोहन दिवटे, प्रकाश रेवतकर,

प्रकाश बारापात्रे, सचिन खेडीकर, परीक्षित कुलकर्णी, गोपाल किलावत यांच्यासह अनेक माजी सैनिक व नागरिक उपस्थित होते.

देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या आणि काळाच्या पडद्याआड हरवलेल्या या अनामवीरांना पितृपक्षात तर्पण अर्पण

करून त्यांच्या त्यागाचे स्मरण करण्याचा ईवानचा उपक्रम समाजात कृतज्ञतेची आणि राष्ट्रभक्तीची भावना

जागृत करणारा ठरला.

नागपूर येथे 2026 मध्ये ईवान संस्थेतर्फे पितृपक्षात अमर जवान स्मारकावर देशासाठी बलिदान देणाऱ्या अनामिक

शहीदांना तर्पण व श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Social Media