गडचिरोलीसह महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक

Amazon-Microsoft : गडचिरोलीसह महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक
मुंबई : उत्तर महाराष्ट्राच्या पाचही जिल्ह्यात गुंतवणूक आली आहे. नंदुरबार मध्ये गुंतवणूक करण्यासाठी अजून 3 कंपनी चर्चा करत आहेत.
लोढांच्या मुलांसोबत करार केला. इथे बसून करार का नाही केला असा प्रश्न विचारला जातो. त्यांचे सुपुत्र हे देशातील लिडिंग उद्योजक आहेत. गुंतवणूक अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट अशा डाटा सेंटर कंपनी करणार आहेत. हा करार लोढांचा नाही, तर त्यांच्यावतीने केलेला करार आहे. गुगल, मेटा अशा कंपनी गुंतवणूक करणार आहेत. त्यांच्यावतीने पंचशीलने करार केला. (Amazon-Microsoft)

पण हे समजून न घेता टीका केली जात आहे, आम्ही काय फिरायला गेलो नव्हतो. दावोस इज व्होरी सिरीअस बिझनेस, असे म्हणत दावोसवरील टीकेला देवेंद्र फडणणवीसांनी प्रत्त्युत्तर दिलंय. देशात परकीय थेट गुंतवणूक सर्वाधिक महाराष्ट्रात येत असते. प्रत्यक्ष जे पैसे देशात आलेत एफडीआय रुपाने त्यात पहिल्या क्रमांकावर आहे, 39 टक्के एफडीआय गुंतवणूक येत आहे.

महाराष्ट्रात 11.7 टक्के बेरोजगारी दर कधीच नव्हता. महाराष्ट्र कोणाच्याही काळात 10 टक्क्यांच्या वर नव्हता. मोठे उद्योग करार केल्यानंतर कंपन्या 7 वर्ष घेतात, काही 2 वर्षात देखील प्रोडक्शनवर येतात. आपण जीएसडब्ल्युसोबत 2025 मध्ये करार केला होता, आता जूनमध्ये त्यांची पहिली ईव्ही संभाजीनगर येथे तयार होत आहे. 2025 मध्ये आपण 48 करार केले होते, त्यातील 88 टक्के करार अंमलबजावणीत आहेत. देशात होणाऱ्या करारांपैकी 35 टक्के अंमलबजावणी होते, महाराष्ट्राने तो रेशो 55 टक्के ठेवला आहे. दावोसबाबत तर तो दर महाराष्ट्राने 75 टक्के ठेवला आहे, अशी माहितीही देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दिली.

Social Media