निक-जोनास-लापुरी-चादरीत : सोलापूरच्या पारंपरिक जेकार्ड चादरीची तसं पाहिल्यास जगभर ख्याती. सोलापुरी चादरीची वैशिष्ट्यं म्हणजे, आकर्षक डिझाईन, जाडसर, प्युअर कॉटन , ऊबदार, टिकाऊ. परंतु, या चादरीचे इतर राज्यांतून डुप्लिकेशन सुरू होऊन सोलापुरी चादरीला फटका बसलाय… सोलापूरची चादर पांघरूण घेण्यासाठी उपयोगी आहे, असे म्हटलं जातं. मात्र, त्याचा आकर्षक फॅशनेबल शर्टही शिवून घेतला जाऊ शकतो, हे कोणाच्या मनातही आलं नसेल. मात्र चादरीपासून फॅशनेबल शर्ट शिवला जातो आणि तो सर्वांचे लक्षही वेधून घेतो, हे सिद्ध केलंय अमेरिकन पॉपस्टार निक जोनास(Popstar Nick Jonas) याने.