मातीच्या-गणेश-मुर्तींची-मागणी : रायगड (Raigad)जिल्हयातील पनवेल तालुक्यातील तारा गावातील, युसुफ मेहेर अली सेंटरने (Yusuf Meher Ali Center)टेराकोटा (Terracotta)मातीच्या गणेश मूर्ती बनविण्याचे कार्य, सुरू केले असून येथील लाल मातीच्या गणेश मुर्तींची मागणी वाढलीये.. येथे पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करण्यात आल्या असून ग्राहकांना त्यांच्या घरीच गणेश मूर्तीचे विसर्जन करता येणार आहे.. टेराकोटा मातीपासून बनविलेली मूर्ती कमीत कमी पाण्यात सहज विरघळते.