रस्त्यावर उतरून सत्य व अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्याची दुसरी लढाई लागणार: हर्षवर्धन सपकाळ

Truth-and-Non-violence : ‘भारतात येणारी आर्थिक त्सुनामी’, विषयावर टिळक भवन मध्ये विशेष चर्चासत्र संपन्न.
मुंबई : प्रदेशाध्यक्ष काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan-sapkal) म्हणाले की, देश आज मुठभर लोकांच्या हातात गेला आहे, आपल्या गळ्याभोवती फास आवळला आहे. लढण्याची जिद्द कुठे गेली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. देशातील आजची परिस्थीती पाहता आपल्याला सत्य व अहिंसेच्या मार्गाने रस्त्यावर उतरून स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढावी लागणार आहे.

चुकीचे काही घडत असेल तर त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे. संपूर्ण मे महिना मी राज्यभर फिरून महत्वाच्या विषयावर आंदोलन केले. राज्यात फिरताना काही गोष्टी निदर्शनास आल्या, त्यात ५०० रुपयांच्या नोटा संपल्याचे चित्र आहे, बँकेत पैसे नाहीत. परिक्षा आहे पण पेपर लिक, डिग्री आहे पण नोकऱ्या नाहीत, अशी अवस्था आहे. शिक्षणाकडेही तरुण पाठ फिरवत आहेत. खरिपाचा हंगाम सुरु आहे पण शेतकरी नाराज आहे. शेतमालाला भाव नाही, खदखद वाढली आहे, परिस्थिती गंभीर आहे यातून मार्ग काढावा लागेल.जात व धर्म हे राजकीय विषय करण्यापेक्षा आर्थिक विषयावर राजकारण व्हावे अशी अपेक्षा सपकाळ यांनी व्यक्त केली. (Truth-and-Non-violence)

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अर्थशास्त्र विभाग व ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस,यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतात येणारी आर्थिक त्सुनामी?’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा,(Yashwant Sinha)  ज्येष्ठ अर्थतज्ञ प्रा. अरुणकुमार,(Arun-Kumar) माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण(Prithviraj-Chavan), माजी खासदार व नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर,(Dr. Bhalchandra-Mungekar)माजी खा. कुमार केतकर आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan-sapkal)होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख विश्वास उटगी यांनी केले. पाहुण्यांची ओळख माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी करून दिली. आभारप्रदर्शन माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर (Dr. Bhalchandra-Mungekar) यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गजानन देसाई यांनी केले.

Social Media