Rashami-Desai : ‘तुम हो ना- घर की सुपरस्टार’ या टीव्ही शोच्या आगामी एपिसोडमध्ये अभिनेत्री रश्मी देसाई एका प्रोमोमध्ये तिच्या आयुष्यातील कठीण काळाबद्दल बोलताना भावूक झाली. तिने सांगितले की, एकेकाळी ती तिच्या आईपासून आणि कुटुंबापासून पूर्णपणे दुरावली होती.
शोचे होस्ट राजीव खंडेलवाल यांच्याशी बोलताना रश्मीने सांगितले की, हा तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता. तिने कबूल केले की त्या वेळी तिला वाटले की आपले करियर आणि आयुष्य सर्व संपले आहे. रश्मीने सांगितले की, त्यादरम्यान तिच्या आईशी बोलणे झाले नाही. तिने आईला ब्लॉक केले होते आणि कुटुंबातील कोणत्याही सदस्याशी संपर्क साधला नव्हता. (Rashami-Desai)
रश्मी म्हणाली, “मला वाटलं होतं की माझं आयुष्य इथेच संपलं आहे. हे घर सोडताच माझं करिअर आणि वैयक्तिक आयुष्य निघून जाईल. माझ्याकडे पैसेही कमी होते आणि माझ्यावर विश्वास ठेवता येईल असे काही नव्हते.” नदीम भाई यांचे विशेष कृतज्ञता व्यक्त करताना ती म्हणाली की त्यांनी तिला त्या कठीण काळात खूप मदत केली.
४० वर्षीय टीव्ही स्टार म्हणाली, “जसं आयुष्य संपलं… (Rashami-Desai)
रश्मी म्हणाली, “निधी, जीविता आणि नदीम भाई, हे तीनच लोक होते ज्यांना माझे संपूर्ण वास्तव माहीत होते. मी कधीच खोटं बोलत नाही आणि स्टोरीही बनवत नाही. चार किंवा दहा वर्षांनंतरही मला विचाराल तर उत्तरे सारखीच असतील.” या अनुभवातून मिळालेल्या धड्यांबद्दलही रश्मीने सांगितले. चुका या जीवनाचा एक भाग असल्याचे ती म्हणाली. पुन्हा पुन्हा विचार करून आपण त्यांना मोठे करतो. परंतु, प्रत्यक्षात, आपण इतरांच्या चुकांपेक्षा आपल्या स्वतःच्या चुकांमधून अधिक शिकतो.
रश्मीने अनेक महिलांना संदेश दिला की, आयुष्य पुन्हा सुरू करायला हरकत नाही. तुमच्या चुका मान्य करा आणि तुम्ही जे भोगले आहे त्याबद्दल उघडपणे बोला. ती म्हणाली की जेव्हा सगळे तुमच्या विरोधात असतात तेव्हा तीच उत्तम वेळ असते. त्यावेळी तुमच्या आयुष्यात महत्त्वाची नसलेली माणसे आणि त्यासारख्या गोष्टी आपोआप नाहीशा होतात आणि फक्त तेच राहतात जे तुमच्यासाठी योग्य असतात.
रश्मीने सांगितले की, फेब्रुवारी 2020 मध्ये तिच्या वाढदिवसानंतर तिच्या आईसोबत पुन्हा संवाद सुरू झाला. रश्मीने सांगितले की, अनेक गैरसमज झाले होते. ती स्वत:ला बंडखोर आणि अतिशय महत्त्वाकांक्षी मुलगी मानते. तिला काही करायचे असेल तर आई घाबरायची.