proximity : नागपूरात “सानिध्या” परिसंवाद मालिकेची सुरुवात.
नागपूर : दक्षिण मध्य विभागीय सांस्कृतिक केंद्र,(Cultural-Centre) सांस्कृतिक मंत्रालय (Ministry of Culture)भारत सरकार यांच्या वतीने २६ मे ते ५ जून २०२६ या कालावधीत “सानिध्या” ही परिसंवाद आणि चर्चा मालिका आयोजित करण्यात आली आहे.
२६ मे रोजी सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना व गुरू पद्मश्री शोवना नारायण (Shovana-Narayan)यांच्या व्याख्यानाने या मालिकेची सुरुवात झाली. दीपप्रज्वलन सोहळा ज्येष्ठ नृत्यगुरू श्री मदन पांडे,(Madan-Pandey) संचालिका श्रीमती आस्था कार्लेकर आणि सूत्रसंचालक कु. मधुरा फाटक यांच्या हस्ते पार पडला. उद्घाटनानंतर वंदे मातरम आणि महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले.
शोवना नारायण यांनी त्यांच्या संशोधन प्रवासाचा अनुभव मांडताना कथकचा उगम उत्तर प्रदेश व बिहारमधील मंदिर परंपरेतून कसा झाला यावर प्रकाश टाकला. “कथकलोक” (“Kathakalok”)या प्रकल्पांतर्गत त्यांनी गीतिका कल्हासोबत ७००० किमीचा संशोधन प्रवास केला असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर कथ्थक परंपरेवर आधारित चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले.
पुढील कार्यक्रमांची रूपरेषा (proximity)
• २७ मे २०२६ : गुरू शोवना नारायण यांचे “बोलणारी शिल्पे” व्याख्यान व छत्तीसगडच्या पांडवानी गायिका श्रीमती सांप्रिया पूजा निषाद यांचे सादरीकरण.
• १ व २ जून २०२६ : गुरू राणी खानम यांचे “कथकवरील पर्शियन प्रभाव” व “सूफी साहित्य आणि कथक” विषयांवरील चर्चा.
• ३ जून २०२६ : डॉ. चित्रा शर्मा यांचे “विविध गुरु आणि घराण्यांवरील संशोधन संवाद” व श्री विष्णू अशोक धोंगडे (Vishnu-Ashok-Dhongde)यांचे पारंपरिक गोंधळ-जागरण.
• ४ व ५ जून २०२६ : जयपूर घराण्याचे गुरू चरण गिरधर चंद यांचे व्याख्यान.
• ५ जून २०२६ : श्रीमती रेखा जलछत्री यांचे भर्तरी गायन.
ही मालिका कथ्थक आणि लोकपरंपरा यांच्यातील गहन नाते उलगडून दाखवते. संचालिका श्रीमती आस्था कार्लेकर यांनी सर्व रसिकांना या चर्चासत्र मालिकेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.