Nida-Khan : निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा: मंत्री संजय शिरसाट यांची मागणी.

Nida-Khan : निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा: मंत्री संजय शिरसाट यांची मागणी.

Nida-Khan : निदा खान अटक प्रकरणात एमआयएम नेते इम्तियाज जलील यांना सहआरोपी करण्याची मागणी संजय शिरसाट यांनी केली असून, याबाबत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra-Fadnavis) यांच्याकडे मागणी करणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर : नाशिकमधील आयटी कंपनीतील बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणात संशयित आरोपी निदा खानला मदत केल्याप्रकरणी एमआयएम नेते इम्तियाज जलील यांना सहआरोपी करण्याची मागणी पालकमंत्री संजय शिरसाट (Sanjay-Shirsat) यांनी केली आहे. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra-Fadnavis) यांच्याकडे याबाबत मागणी करणार आहेत. शिरसाट म्हणाले, पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये निदा खानची आई आणि मावशी आहेत.

ज्या रूममध्ये हे कृत्य घडले, ती रूम एका नगरसेवकाची आहे, जरी ती त्याच्या नावावर नसली तरी मालकी त्याचीच आहे. इम्तियाज जलील यांनी यापूर्वी नाशिकमध्ये जाऊन निदा खानची पाठराखण केली होती. आरोपीला आश्रय देणे हा देखील गुन्हा आहे, जो इम्तियाज जलील आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांना सहआरोपी करावे, अशी मागणी शिरसाट यांनी केली.

संजय शिरसाट काय-काय म्हणाले? (Nida-Khan)

दरम्यान, संजय शिरसाट (Sanjay-Shirsat) यांनी पत्रकार परिषदेत आरोप केला की एमआयएम मुंब्रा, नाशिक, पुणे अशा अनेक ठिकाणी धर्मांतर आणि फसवणूक यांसारख्या गतिविधी वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. निदा खान केवळ एक मोहरा असून त्यांचे जाळे महाराष्ट्रभर पसरलेले आहे.

अहिल्यानगर,(Ahilyanagar) पुणे,(pune) छत्रपती संभाजीनगरमध्येही (Chhatrapati-Sambhajinagar)हे प्रकार दिसून येतात. समाजात हिंदूंविषयी द्वेष पसरवून त्यांचे धर्मांतर करण्याचे षडयंत्र रचले जात असल्यामुळे समाजामध्ये राग आणि चीड निर्माण झाली आहे, असे शिरसाट म्हणाले.

नाशिक प्रकरणात निदा खानला अटक करण्यात आली असून तिच्याकडून माहिती समोर येईलच. या प्रकरणी एसआयटी चौकशी व्हावी आणि मास्टरमाईंड कोण आहे हे उघड व्हावे, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. असे शिरसाट म्हणाले.

संजय शिरसाट म्हणाले, “मला वाटतं या प्रकरणाची पाळेमुळे खूप दूरवर पसरलेली आहेत. 22 ते 30 वयोगटातील मुलांना ट्रेंड करणं, ज्यांच्याकडे काम नाही, शिक्षण नाही, पण महागड्या मोटारसायकली, आयफोन आहेत आणि फिरण्यासाठी पैसे आहेत, हे पैसे कुठून येतात याचा तपास पोलिसांनी करायला हवा. बलात्कार, धर्मांतर, फसवणूक आणि नशेखोरीच्या माध्यमातून हे होत आहे. त्यामुळे इम्तियाज जलील आणि त्यांच्या सहकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे, यातून मोठं षडयंत्र उघडकीस येईल.”

इम्तियाज जलील यांच्याविरोधात पुरावे काय? शिरसाट म्हणाले…

नाशिकमधील महिलेला उघडपणे समर्थन देणे, तिच्यासाठी पत्रकार परिषदा घेणे, जाहीर सभांमधून तिची बाजू मांडणे, हे मुंब्र्यातील घटनेसारखेच आहे. मुंब्रा प्रकरणात जातीय रंग होता. या सर्वांची बाजू घेऊन तुम्हाला काय साध्य करायचे आहे, हे स्पष्ट होते. त्यामुळेच या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी माझी मागणी आहे. आम्हाला शंका आहे आणि लोकांमध्येही चर्चा आहे.

नाशिकची महिला मुंबई, मालेगाव, ठाणे येथे न जाता छत्रपती संभाजीनगरलाच का येते? तिला अटक झाली तो नारेगाव परिसर अनोळखी आहे. त्यामुळे हे सर्व कृत्य करणारे आणि यामागील सूत्रधार निश्चितच संभाजीनगरमध्ये आहेत. संभाजीनगर अनेक वर्षांपासून अतिरेकी कारवायांसाठी प्रसिद्ध आहे, त्यामुळे या विषयाची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे, असे संजय शिरसाट म्हणाले.

Social Media