रिलीजपूर्वीच ‘राजा शिवाजी’नं 193 कोटींची कमाई कशी केली?

‘King-Shivaji’ :रिलीजपूर्वीच ‘राजा शिवाजी’नं 193 कोटींची कमाई कशी केली?
‘King-Shivaji’ : रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या ‘नॉन-थिएट्रिकल राइट्स'(‘Non-Theatrical-Rights) ची किंमत 193 कोटी रुपये असल्याने तो प्रदर्शनापूर्वीच निर्मात्यांसाठी फायदेशीर ठरला आहे, कारण ही रक्कम चित्रपटाच्या बजेटपेक्षा खूप जास्त आहे.

‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे ओटीटी हक्क ९५ कोटी, म्युझिक राइट्स २८ कोटी आणि सॅटेलाईट राइट्स ७० कोटी रुपयांना विकले गेले आहेत. प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाने एकूण १९३ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. अंदाजे १२० कोटी रुपये बजेट असलेल्या या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच ७० कोटींहून अधिक नफा कमावला आहे.

‘राजा शिवाजी’ हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असून, रितेश देशमुख यात मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. ट्रेलरमधील काही दृश्यांमुळे शंका उपस्थित केल्या जात असल्या तरी, प्रदर्शनापूर्वीच झालेला मोठा व्यवसाय चित्रपटसृष्टीतील तज्ज्ञांच्या मते सकारात्मक आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्म्स, म्युझिक कंपन्या आणि टीव्ही चॅनल्स यांनी या चित्रपटावर विश्वास दाखवला आहे. १ मे रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट जर थिएटरमध्ये यशस्वी ठरला, तर तो ब्लॉकबस्टर नक्कीच ठरू शकतो.

Social Media