Caricature : – ‘वाटेवरी अजूनी काटे’ या व्यंगचित्रातून उबाठा, काँग्रेसवर निशाणा
मुंबई : संसदेत विरोधकांनी नारी शक्ती वंदन अधिनियम या एनडीए सरकारने आणलेल्या विधेयकाला कडाडून विरोध केल्याने ते पारित होऊ शकले नाही. महिला सक्षमीकरणाच्या एरव्ही गप्पा करणाऱ्या देशातील सर्वच विरोधकांनी याला सडकून विरोध केला. यात, मुख्य भूमिकेत असलेल्या काँग्रेससह महाराष्ट्रातल्या उबाठा गटानेही विरोध केला. उबाठा गट आणि काँग्रेसच्या या विरोधाला शिवसेनेने सोशल मीडियावर व्यंगचित्रातून(Caricature ) परखड उत्तर दिले.
नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयक आणि परिसीमन विधेयकामुळे सदस्यसंख्या वाढलेल्या संसदेत महिलांना ३३% आरक्षण मिळणार होते. यासाठी शिवसेना सहभागी असलेल्या एनडीए सरकारने उदात्त हेतूने हे विधेयक संसदेत आणले होते. शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी या विधेयकाला तात्काळ पाठिंबा देणारे पत्र देशाचे आदरणीय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांना पाठवले होते. मात्र, दुसरीकडे काँग्रेस, उबाठा गट, समाजवादी पार्टी, तृणमूल काँग्रेस, दक्षिणेतील पक्षांनी या विधेयकाला पाठिंबा दिला नाही.
विशेषकरून, यातील उबाठा गट महाराष्ट्रातही माझी लाडकी बहीण सारख्या महत्त्वाच्या योजनांना विरोध करत होता. त्यांनी याही विधेयकाला जोरदार विरोध करून आपली महिलांची अडवणूक करणारी भूमिका दाखवून दिली. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या सोशल मीडिया पेजेसवर प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्रात संसदेत संविधानाची प्रत घेऊ जाणाऱ्या महिलेच्या वाटेत काटे पेरणारे राहुल गांधी, उद्धव ठाकरे, संजय राऊत, अरविंद सावंत, अखिलेश सिंह यादव दाखवले आहेत. महिलेची प्रगती होण्याच्या वाटेवर छद्मी हास्य करणारे हे विरोधक दाखवून शिवसेनेनं व्यंगचित्रातून त्यांना चपराक लगावली आहे. हे व्यंगचित्र(Caricature) सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून अनेक जण त्यावर विरोधकांवर आणि विशेषतः उबाठा गटावर टीका करताना दिसत आहेत.