Doraemon : ‘डोरेमॉन’चे दिग्दर्शक शिबायामा त्सुतोमू यांचे निधन; ॲनिमेशन विश्वावर शोककळा

Doraemon : जागतिक स्तरावर लोकप्रिय असलेल्या डोरेमॉन(Doraemon) या जपानी ॲनिमे मालिकेचे दिग्दर्शक त्सुतोमू शिबायामा(Tsutomu Shibayama) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने जागतिक ॲनिमेशन क्षेत्रात मोठी हानी झाली असून चाहते त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

दोन दशकांहून अधिक काळाचा सुवर्णप्रवास (Doraemon)

शिबायामा यांनी सुमारे २० वर्षांहून अधिक काळ ‘डोरेमॉन’ मालिकेचे यशस्वी दिग्दर्शन केले. १९७९ मध्ये सुरू झालेल्या या मालिकेला जागतिक स्तरावर पोहोचवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांनी या फ्रँचायझीवरील तब्बल २२ चित्रपटांचे दिग्दर्शन करून या मालिकेची लोकप्रियता पिढ्यानपिढ्या टिकवून ठेवली.
त्यांनी १९७८ मध्ये Osamu Kobayashi आणि Michishiro Yamada यांच्या सहकार्याने Ajia-do Animation Works या स्टुडिओची स्थापना केली होती. ‘डोरेमॉन’ व्यतिरिक्त त्यांनी Chibi Maruko-chan, Lupin III आणि Kaiketsu Zorori यांसारख्या गाजलेल्या मालिकांचेही दिग्दर्शन केले.

कर्करोगाशी झुंज अपयशी

शिबायामा त्सुतोमू हे काही काळापासून Lung Cancer या आजाराशी झुंज देत होते. ६ मार्च २०२६ रोजी त्यांचे निधन झाले, तर १७ मार्च रोजी त्यांच्या निधनाची अधिकृत घोषणा करण्यात आली.
Ajia-do Animation Works यांनी जारी केलेल्या निवेदनात त्यांच्या निधनामुळे ॲनिमेशन क्षेत्राचे मोठे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

अजरामर ठरलेली पात्रे

‘डोरेमॉन’मधील Nobita Nobi, Shizuka Minamoto, Takeshi Goda (Gian) आणि Suneo Honekawa ही पात्रे आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. या पात्रांमधून त्यांनी मैत्री, कल्पनाशक्ती आणि जीवनमूल्ये यांचे सुंदर दर्शन घडवले.

चाहत्यांकडून श्रद्धांजली

शिबायामा यांच्या निधनाने जपानसह जगभरातील ॲनिमेशन प्रेमींमध्ये शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्या कार्याची आठवण काढत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
शिबायामा त्सुतोमू यांचे योगदान केवळ ‘डोरेमॉन’पुरते मर्यादित नव्हते, तर त्यांनी संपूर्ण ॲनिमेशन उद्योगाला एक वेगळी दिशा दिली—जी कायम स्मरणात राहील.

Social Media