लोणी : सहकाराची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्या लोणी येथे जलसंपदा विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धाचा शानदार शुभारंभ झाला.जनतेच्या सेवेत दिसणारे सर्वच वरीष्ठ अधिकारी कर्मचारी खेळाडूच्या रुपाने आपल्यातील कला आणि क्रीडा कौशल्य दाखविण्यासाठी उत्साहाने समर्थपणे सरसावल्याचे पाहायला मिळाले! (State-level-sports-competition)
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या वतीने लोणी – शिर्डी (ता. राहाता) येथे आयोजित जलसंपदा विभागाच्या ‘पाचव्या राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा-२०२६’ चे यजमान पद अहील्यानगर जिल्ह्याला मिळाले कार्यक्रमास राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna VikhePatil) यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धाचे नियोजन करण्यात आले.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे मैदान स्पर्धकांनी गजबजले (State-level-sports-competition)
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांच्या उपस्थितीत प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचा शुभारंभ झाला.उद्घाटनास जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त खेळाडू आणी सध्या प्रशासनात कार्यरत असलेले पंकज शिरसाठ अक्षय आव्हाड श्वेता गवळी यांना विशेष निमंत्रीत करुन सन्मानित करण्यात आले.
जलसंपदा मंत्री श्री. महाजन म्हणाले, मी स्वतः शालेय जीवनापासून खेळाशी जोडलेलो आहे. एक खेळाडू म्हणून मला खेळाचे महत्त्व जवळून माहित आहे. तुम्ही या स्पर्धेकडे नियमित व्यायाम व सराव म्हणून पाहिले पाहिजे.
जीवनात शारीरिक तंदुरुस्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. व्यायाम ही आपली रोजची गरज बनली पाहिजे. जेव्हा आपली शरीरयष्टी चांगली असते, तेव्हा मनही सुदृढ राहते. सुदृढ मनामुळे कामात एकाग्रता वाढते, चिडचिड होत नाही व कामाचा अतिरिक्त ताण जाणवत नाही.
आजच्या धावपळीच्या युगात कामाचे ओझे निश्चितच जास्त आहे, पण त्यावर मात करण्यासाठी व्यायामाला पर्याय नाही. त्यामुळे दिवसातून किमान अर्धा-पाऊण तास तरी स्वतःसाठी वेळ काढा. धावणे, चालणे किंवा योगासने करा. अनेकदा तणाव आला म्हणून लोक व्यसनाचा आधार घेतात, परंतु तणाव कमी करण्यासाठी व्यसनाची मुळीच गरज नसते. जर तुमची तब्येत चांगली असेल, तर मनस्थिती आपोआपच चांगली राहते. तुमच्या मनगटात ताकद असेल, तर मनात आपोआप धाडस निर्माण होते. हे केवळ नियमित व्यायाम व सुदृढ शरीरामुळेच साध्य होऊ शकते, असेही मंत्री महाजन यांनी सांगितले.
पालकमंत्री डॉ. विखे पाटील (Dr. Vikhe Patil)म्हणाले, सहकाराचा वारसा लाभलेली ही भूमी आता क्रीडा संस्कृतीचे संवर्धन करत आहे. ज्याप्रमाणे सहकारातून विकासाची दिशा मिळते, तसेच खेळाच्या माध्यमातून प्रशासनात शिस्त व सांघिक भावना रुजविण्याचे आमचे ध्येय आहे. अहिल्यानगरच्या मातीत सेवाभाव व खेळाडूवृत्तीचा अनोखा संगम साधला गेला असून, स्पर्धेतील जय-पराजयापेक्षा येथून मिळणारी सकारात्मक ऊर्जा व प्रशासकीय मैत्रीबंध अधिक घट्ट करणे, हाच या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.