सीबीएसई दहावी-बारावी परीक्षा 2026 पुढे ढकलल्या

CBSE-10th-12th-Exam :  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने जाहीर केले आहे की 3 मार्च 2026 रोजी होणाऱ्या

दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मंडळाने सांगितले की नवीन वेळापत्रक लवकरच अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) प्रशासकीय कारणास्तव इयत्ता 10वी आणि 12वी च्या 3 मार्च 2026 रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. सुधारित वेळापत्रकानुसार, इयत्ता 10वी च्या तिबेटी, भोटी, भुतिया, बोडो, तंगखुल, मिझो, काश्मिरी, जर्मन, जपानी, स्पॅनिश, बहासा मेलयु या भाषा विषयांची परीक्षा आणि नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC), बुक किपिंग आणि अकाउंटन्सी या विषयांची परीक्षा आता 10 एप्रिल रोजी होईल,जी पूर्वी 3 मार्च रोजी होणार होती. तसेच, इयत्ता 12वी चा पेपर जो पूर्वी 3 मार्चला होणार होता, तो आता 12 मार्चला होईल.

परीक्षा पुढे, तयारीसाठी अधिक वेळ; सीबीएसईचा निर्णय(CBSE-10th-12th-Exam)

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दहावी व बारावीच्या 2026 मधील परीक्षांच्या

वेळापत्रकात बदल केला असून या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली असून.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तयारीसाठी अधिक वेळ मिळावा, तसेच विविध शैक्षणिक व प्रशासकीय

(Academic and Administrative) कारणांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे सीबीएसईकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना दिलासा: सीबीएसई दहावी-बारावी परीक्षा 2026 पुढे

मंडळाकडून लवकरच सुधारित परीक्षा वेळापत्रक (डेटशीट) अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.

तोपर्यंत विद्यार्थ्यांनी व पालकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांकडे लक्ष देण्याचे आवाहन सीबीएसईने केले आहे.

प्रादेशिक आणि परदेशी भाषा (गट-एल):

• तिबेटी, भोटी, भूतिया: लडाख, सिक्कीम इत्यादी हिमालयीन प्रदेशांतील विद्यार्थी स्थानिक वारसा जतन व अभ्यासासाठी निवडतात.
• बोडो, तंगखुल, मिझो, काश्मिरी: ह्या आसाम, मणिपूर, मिझोराम आणि जम्मू येथील प्रादेशिक भारतीय भाषा आहेत.

महत्वाचे मुद्दे: (CBSE-10th-12th-Exam)

• 3 मार्च रोजी नियोजित असलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षा आता होणार नाहीत.
• विद्यार्थ्यांनी CBSE च्या अधिकृत वेबसाइटवर नियमितपणे तपासावे.
• सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल.
• मंडळाने विद्यार्थ्यांना घाबरू नये व अभ्यास सुरू ठेवावा असे आवाहन केले आहे.

विद्यार्थ्यांसाठी सूचना:

• नवीन तारखा जाहीर होईपर्यंत अभ्यासक्रमाचे पुनरावलोकन सुरू ठेवा.
• CBSE च्या अधिकृत नोटिफिकेशनवरच विश्वास ठेवा.
• अफवांवर विश्वास ठेवू नका.

हेही वाचा : सर्वात कमी फीमध्ये MBBS करण्याची संधी: परदेशात डॉक्टर होण्याचा स्वस्त मार्ग

Social Media