व्यवसायासाठी सरकारकडून १० लाख रुपयांचे कर्ज; या अटी पूर्ण करणे आवश्यक

Mudra-Loan-Scheme : व्यवसाय करण्यासाठी सरकार देते 10 लाखांचे कर्ज, या अटींची पूर्तता आवश्यक, अर्ज करण्याची पद्धत जाणून घ्या

मुंबई :  नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने विशेष योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र अर्जदारांना १० लाख रुपयांपर्यंतचे व्यवसाय कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. मात्र, हे कर्ज मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.

मुद्रा कर्ज म्हणजे काय?(Mudra-Loan-Scheme)

लहान उद्योजक आणि गृहिणींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांनी 2015 मध्ये प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) सुरू केली. या योजनेत लघु व्यावसायिक, फेरीवाले, महिला व छोटे दुकानदार यांना 10 लाखांपर्यंत कर्ज मिळते. PMMY म्हणजे मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी (MUDRA) कर्ज योजना. केंद्र सरकार व्यक्ती, लघु व मध्यम उद्योग (SME) आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (MSME) सोप्या अटींवर कमी व्याजदरात कर्ज देते. यात मुदत कर्ज, खेळते भांडवल आणि ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध आहेत.

तुम्ही कोणत्या व्यवसायासाठी कर्ज घेऊ शकता?

तुम्ही ट्रॅक्टर, ऑटो-रिक्षा, टॅक्सी, ट्रॉली, टिलर, मालवाहू वाहने, तीन-चाकी आणि ई-रिक्षांसारखी व्यावसायिक वाहतूक वाहने खरेदी करण्यासाठी मुद्रा कर्ज घेऊ शकता. तसेच, सलून, जिम, टेलरिंग शॉप, मेडिकल शॉप, रिपेअर शॉप, ड्राय क्लीनिंग आणि फोटोकॉपी शॉप सुरू करण्यासाठी, तसेच पापड, लोणची, आईस्क्रीम, बिस्किटे, जॅम, जेली आणि मिठाई बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी हे कर्ज उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, दुकाने, सेवा व व्यावसायिक उपक्रम, बिगरशेती नफा कमावणारे उपक्रम, कृषी-क्लिनीक, कृषी-व्यवसाय केंद्र, अन्न आणि कृषी-प्रक्रिया युनिट, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, मधमाशी पालन, वर्गीकरण, पशुधन संगोपन, प्रतवारी, कृषी-उद्योग, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय इत्यादींसाठी मुद्रा कर्ज मिळू शकते.

मुद्रा योजनेत शिशु, किशोर आणि तरुण असे तीन प्रकारचे कर्ज उपलब्ध आहेत. शिशु योजनेत ५० हजार पर्यंत, किशोर योजनेत ५०,००१ ते ५ लाख पर्यंत, तर तरुण योजनेत ५,००,००१ ते १० लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.Mudra-Loan-Scheme

 

महत्त्वाच्या अटी:(Mudra-Loan-Scheme)

  • अर्जदार भारतीय नागरिक असावा.
  • वय १८ ते ५५ वर्षांच्या दरम्यान असावे.
  • व्यवसायाचा ठोस आराखडा (Business Plan) सादर करावा लागेल.
  • कर्ज परतफेडीची क्षमता दाखवणारे आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे.
  • काही प्रकरणांत हमीदार किंवा तारणाची मागणी केली जाऊ शकते.

अर्ज करण्याची प्रक्रिया:

  • अर्जदाराने अधिकृत सरकारी पोर्टलवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा.
  • आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी.
  • अर्जाची पडताळणी झाल्यानंतर बँक किंवा संबंधित संस्था अर्जदाराशी संपर्क साधेल.
  • मंजुरीनंतर कर्जाची रक्कम थेट अर्जदाराच्या खात्यात जमा केली जाईल.

या योजनेमुळे तरुण उद्योजकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळणार असून रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.Mudra-Loan-Scheme

हेही वाचा – बजेट २०२६ : उद्योग क्षेत्राची कर वाद निराकरणासाठी जलद यंत्रणेची मागणी

Social Media