Silver-ETF : भारतीय बाजारात चांदीच्या दराने पहिल्यांदाच २ लाखांचा टप्पा पार केला आहे. या ऐतिहासिक वाढीमुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Silver-ETF)
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरात वाढ होत आहे. केवळ दागिनेच नव्हे, तर गुंतवणूकदारांसाठी हा एकआकर्षक पर्याय बनला आहे. 17 डिसेंबर रोजी चांदीने प्रथमच 2 लाख रुपये प्रति किलोचा टप्पा ओलांडला.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, चांदीची किंमत 2 लाख 750 रुपये प्रति किलो झाली आहे,जी यापूर्वी 1 लाख 91 हजार 977 रुपये होती.
8 मार्च रोजी चांदीने 1 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला
IBJA नुसार, 18 मार्च रोजी चांदीने प्रथमच 1 लाख रुपये पार केले आणि केवळ 9 महिन्यांत 2 लाखांचा टप्पा गाठला. सध्या चांदी सर्वकालीन उच्चांकावर असून यावर्षी आतापर्यंत 35% परतावा दिला आहे. त्यामुळे गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ आहे. (Silver-ETF)
चांदी गुंतवणुकीचे ४ पर्याय (Silver-ETF)
चांदीमध्ये प्रत्यक्ष दागिने, नाणी किंवा बारमध्ये गुंतवणूक करता येते. एमसीएक्समध्येही गुंतवणूक करता येते. गुंतवणुकीसाठी चांदीचे म्युच्युअल फंड्स उपलब्ध आहेत.
डिजिटल गुंतवणुकीसाठी सिल्व्हर ईटीएफ हा सोपा पर्याय असून, यात शारीरिक हाताळणी आवश्यक(Required) नाही.
ईटीएफ म्हणजे काय?( What is an ETF?)
ईटीएफ म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड. हा स्टॉक एक्सचेंजवर ट्रेड होणारा एक फंड आहे. पूर्वी गोल्ड ईटीएफ लोकप्रिय होते, परंतु आता गुंतवणूकदारांमध्ये सिल्व्हर ईटीएफची मागणी वाढत आहे. सिल्व्हर ईटीएफ म्हणजे चांदीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची सोय. (Silver-ETF)
चांदीचा दर (Price of silver)
• चांदीने पहिल्यांदाच २ लाखांचा आकडा गाठला.
• मौल्यवान धातूंमध्ये सोन्यानंतर चांदीला मोठी मागणी वाढली आहे.
सिल्वर ETF मध्ये गुंतवणुकीची संधी
• तज्ज्ञांच्या मते, सिल्वर ETF (Exchange Traded Fund) हे गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय ठरू शकतात.
• ETF द्वारे गुंतवणूकदारांना थेट धातू खरेदी न करता सुरक्षित आणि सोयीस्कर गुंतवणूक करता येते.
• पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्यासाठी चांदी ETF हा प्रभावी मार्ग मानला जात आहे.
तगडी कमाईचा मार्ग
• चांदीच्या दरातील वाढीमुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळू शकतो.
• ETF मध्ये गुंतवणूक केल्याने जोखीम कमी होते आणि बाजारातील चढ-उतारांवर लक्ष ठेवणे सोपे जाते.
एकूणच, चांदीच्या ऐतिहासिक वाढीमुळे गुंतवणूकदारांसाठी सिल्वर ETF हा पोर्टफोलिओला चमक देणारा पर्याय ठरू शकतो.