silk-garden : संघ पद्धतीत स्वयंप्रेरणेने काम करणे अपेक्षित असल्याने या कार्यक्रमास येणे कोणावरही बंधनकारक नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
silk-garden : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल आदर व आत्मियता असलेले संघ विचारांचे आमदार रविवारी सकाळी रेशीमबाग येथे भेट देऊन संघ संस्थापक प. पू. सरंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार (Keshav Baliram Hedgewar) व प. पू. द्वीतीय सरसंघचालक श्री गुरुजी यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतील,
अशी माहिती राज्याचे संसदीय कार्य व उच्चशिक्षणमंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील (Chandrakantada Patil) यांनी दिली.
ते म्हणाले की, नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनास आल्यानंतर दरवर्षी भारतीय जनता पार्टीचे व अन्य आमदार रेशीमबागेस भेट देतात. संघ स्वयंसेवक असलेल्या तसेच संघ विचारांच्या आमदारांची ही आत्मीय भावनेने स्वाभाविक कृती असते.
ते संघ पद्धतीने स्वयंस्फूर्तीने रेशीमबागेस भेट देतात. त्यासाठी कोणतेही औपचारिक निमंत्रण नसते. ज्यांना संघ विचारांबद्दल आत्मीयता असते असे लोकप्रतिनिधी अपेक्षित असतात.
संघ पद्धतीत स्वयंप्रेरणेने काम करणे अपेक्षित असल्याने या कार्यक्रमास येणे कोणावरही बंधनकारक नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
मा. चंद्रकांतदादा पाटील (Chandrakantada Patil) म्हणाले की, यंदा संघ शताब्दी वर्षाचे अनेक पूर्व नियोजित कार्यक्रम चालू असल्याने संघ अधिकारी त्यामध्ये व्यस्त आहेत. परिणामी यंदा दरवर्षीप्रमाणे बौद्धिक होणार नाही.
आत्मीय भावाने स्वतःहून येणारे आमदार केवळ अभिवादन करतील. संघ विचारांची बांधिलकी असलेले काही लोकप्रतिनिधी अन्य व्यस्ततेमुळे रविवारी रेशीमबागेत येऊ शकले नाहीत तर ते नंतर येतील.