Daga-Women’s-Hospital :आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची डागा स्त्री रुग्णालय, नागपूर येथे भेट

Daga-Women’s-Hospital : रुग्णालयाच्या कार्यपद्धती व व्यवस्थापनाचे केले कौतुक

नागपूर : महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री  प्रकाश आबिटकर(Prakash Abitkar) यांनी आज नागपूर येथील डागा स्त्री रुग्णालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी संपूर्ण रुग्णालयाची सखोल पाहणी करून विविध विभागांचा आढावा घेतला.

रुग्णालयातील ओपीडी, वॉर्ड, प्रसूती विभाग, शस्त्रक्रिया कक्ष तसेच रुग्णांना दिल्या जाणाऱ्या आरोग्यसेवांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. यावेळी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व कर्मचारी यांच्याशी संवाद साधत सेवा-सुविधांबाबत माहिती घेतली.

डागा स्त्री रुग्णालयामध्ये रुग्णांना दिल्या जाणाऱ्या दर्जेदार आरोग्यसेवा, शिस्तबद्ध कार्यपद्धती तसेच प्रभावी व्यवस्थापनाबाबत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी समाधान व्यक्त केले. रुग्णालय प्रशासन, डॉक्टर व कर्मचारी यांच्या कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.

महिला व मातृआरोग्यासाठी डागा स्त्री रुग्णालयाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून भविष्यातही रुग्णांना अशाच दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

Daga-Women's-Hospital
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची डागा स्त्री रुग्णालय, नागपूर येथे भेट

यावेळी डॉ. दिलीप मडावी, वैद्यकीय अधीक्षक; डॉ. शीतल मेहता; डॉ. शमसुन खानम, अतिरिक्त शल्य चिकित्सक; श्रीमती ललिता मेश्राम, अधिसेविका; श्रीमती आशा मेटांगे, अधिसेविका; डॉ. सीमा पार्वेकर, स्त्रीरोग तज्ज्ञ (वर्ग-१) तसेच डागा स्त्री रुग्णालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.(Daga-Women’s-Hospital)

Social Media