STUDDS-COMPANY-IPO : हेल्मेट उत्पादनात आघाडीवर असलेली हरियाणास्थित Studds Accessories Ltd. कंपनी शेअर बाजारात पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. ७० हून अधिक देशांमध्ये हेल्मेट निर्यात करणारी ही कंपनी ३० ऑक्टोबर २०२५ रोजी आपला IPO (Initial Public Offering) सुरू करणार आहे.हरियाणाची हेल्मेट उत्पादक कंपनी Studds Accessories Limited म्हणजेच Studds आपला IPO लॉन्च करणार आहे. Studs Accessories Limited चा IPO पुढील आठवड्यात गुरुवारी म्हणजेच 30 ऑक्टोबर रोजी सर्वसामान्यांसाठी खुला होईल.
पुढील आठवडा गुंतवणूकदारांसाठी खूप मोठा असणार आहे. Studds सोबत, Lenskart Solutions आणि Orkla India चा IPO देखील पुढच्या आठवड्यात येत आहे. स्टड्स ॲक्सेसरीजने मार्च 2025 मध्ये सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडे त्यांच्या IPO साठी मसुदा दस्तऐवज सादर केला होता. त्याच वेळी, जुलै महिन्यात, SEBI ने Studs Accessories च्या IPO ला मान्यता दिली होती.
IPO चे स्वरूप – फक्त Offer for Sale (OFS):
Studds चा IPO पूर्णपणे Offer for Sale स्वरूपाचा आहे. यामध्ये ७७.८६ लाख शेअर्स विक्रीसाठी ठेवले जाणार आहेत. याचा अर्थ, कंपनीला थेट भांडवल मिळणार नाही, तर विक्रीतून मिळणारी रक्कम प्रमोटर्स आणि विद्यमान शेअरहोल्डर्स यांना मिळेल
तारीख आणि वेळापत्रक:(STUDDS-COMPANY-IPO)
- IPO ३० ऑक्टोबर २०२५ रोजी खुला होईल आणि ३ नोव्हेंबर २०२५ रोजी बंद होईल. २९ ऑक्टोबर रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी बुकिंग सुरू होईल. शेअर्सचे वाटप ४ नोव्हेंबर रोजी निश्चित होईल आणि ७ नोव्हेंबर रोजी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होईल
- कंपनीचे मूल्यांकन:
Studds Accessories चे शेवटच्या शेअर व्यवहारानुसार मूल्यांकन ₹३,५०० कोटींहून अधिक आहे. ही कंपनी भारतातील सर्वात मोठी टू-व्हीलर हेल्मेट उत्पादक आहे - पूर्वीचा IPO प्रयत्न:
Studds ने याआधी २०१८ मध्ये IPO साठी ड्राफ्ट पेपर्स दाखल केले होते, मात्र काही कारणास्तव तो प्रयत्न थांबवण्यात आला होता. यंदा कंपनीचा दुसरा IPO प्रयत्न आहे - गुंतवणूकदारांसाठी संधी:
कंपनीचा जागतिक स्तरावरचा विस्तार, मजबूत ब्रँड ओळख आणि वाढती मागणी पाहता, हा IPO गुंतवणूकदारांसाठी आकर्षक संधी ठरू शकतो. मात्र, OFS असल्यामुळे कंपनीकडून नवीन भांडवल उभारणी होत नसल्याचे लक्षात घेणे आवश्यक आहे.
Studds Accessories चा IPO हे भारतातील ऑटो अॅक्सेसरी क्षेत्रातील एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. गुंतवणूकदारांनी IPO मध्ये सहभागी होण्याआधी कंपनीचा ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (RHP) आणि बाजारातील स्थितीचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे.