महावतार नरसिंह बॉक्स ऑफिसवर गाजतोय! भारतातील सर्वाधिक कमाई करणारा अ‍ॅनिमेटेड चित्रपट ठरला

Mahavatar-Narasimha-Box-Office : महावतार नरसिंह’ने बॉक्स ऑफिसवर आठव्या दिवशीही चांगली कमाई केली. अश्विन कुमार दिग्दर्शित हा चित्रपट २५ जुलै रोजी प्रदर्शित झाला आणि पहिल्या दिवसापासूनच तो बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आहे. वर्षातील बहुप्रतीक्षित चित्रपट असल्याने याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. रिलीजच्या केवळ ८ दिवसांतच, ‘महावतार नरसिंह’(MahavatarNarsimha)ने भारतातील सर्वाधिक कमाई करणारा ॲनिमेटेड चित्रपट बनण्याचा विक्रम केला आहे.

चित्रपटाने रिलीजच्या अवघ्या 8 दिवसांत 60.5 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली. चित्रपटाच्या निर्मात्यांनी इन्स्टाग्रामवर ही बातमी सामायिक केली आणि लिहिले की,  “द डिवाइन ने पूरे राष्ट्र में गूँज दिया है। #MahavatarNarsimha

अश्विन कुमार दिग्दर्शित महावतार नरसिंह या आध्यात्मिक अ‍ॅनिमेटेड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. प्रदर्शनाच्या आठव्या दिवशीच या चित्रपटाने तब्बल ₹60.5 कोटींची कमाई करत भारतातील सर्वाधिक कमाई करणारा अ‍ॅनिमेटेड चित्रपट बनण्याचा मान मिळवला आहे.

🎬 चित्रपटाची वैशिष्ट्ये:(Mahavatar-Narasimha-Box-Office)

  • महावतार नरसिंह हा भगवान विष्णूच्या नरसिंह अवतारावर आधारित आहे.
  • हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये 3D स्वरूपात प्रदर्शित.
  • उत्कृष्ट अ‍ॅनिमेशन, आध्यात्मिक कथा आणि भारतीय संस्कृतीशी जोडलेली भावना यामुळे प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
  • थिएटरमध्ये भक्तीमय वातावरण निर्माण होत असून, काही ठिकाणी प्रेक्षकांनी नरसिंहाच्या वेशात उत्सव साजरे केले.

कमाईचा आलेख:

  • पहिल्या आठवड्यात ₹44.5 कोटींची कमाई.
  • दुसऱ्या शुक्रवारला ₹7.5 कोटींची भर.
  • एकूण कमाई ₹60.5 कोटींवर पोहोचली.

KGF, कांतारा (Kantara)आणि सालार (Salaar)यांसारख्या हिट चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या होम्बळे फिल्म्सने महावतार सिनेमॅटिक युनिव्हर्सची सुरुवात या चित्रपटाने केली आहे. पुढील दशकात भगवान विष्णूच्या इतर अवतारांवर आधारित चित्रपटांची मालिका येणार आहे.

ही केवळ एक चित्रपटगाथा नाही, तर भारतीय अ‍ॅनिमेशन(Animation) आणि आध्यात्मिक(spiritual) कथाकथनाचा नवा अध्याय आहे.

 

Social Media