Ujwal-Nikam : ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून निवड करण्यात आली आहे.
2024 मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवली होती.
मात्र, काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. आता राज्यसभेत राष्ट्रपती कोट्यातून त्यांची खासदारपदी निवड झाली आहे.