तुझ्यात हरविलेला..

।। छे ।।

तुझ्याकडे पाहिलं की,

तुझे डोळेच बोलायला लागतात.

तू मात्र गप्प असतेस,

नि तुझे ओठ थरथरायला लागतात.

भेदक नजरेनं,

तुझी स्पंदनं वाढायला लागतात.

मग अलगद तुझे पाय,

मिठीत येण्यास पुढे सरकतात.

तुडवित काट्याकुट्यांना,

तुझे डोळे मलाच पाहतात.

तू थांबलीस की,

मलाही पुढे खेचतात.

हातात हात देताच,

तुझे केसही चिपकून बसतात.

असे हे माझे लबाड डोळे,

स्वप्नात तुला रोज पाहतात.

 

कवी- प्रो. अश्विन खांडेकर

Social Media