नागपूर : नागपूरमधील उन्हाबद्दल मी लहानपणापासून ऐकत आलो आहे. जेव्हा जेव्हा येतो तेव्हा त्याचा दाह पाहतो. सर्वोच्च तापमानाच्या बाबतीत आज जगातील टॉप टेन शहरांमध्ये नागपूरसह विदर्भातील शहरांचा समावेश आहे. याला पर्याय म्हणजे प्रत्येक नागपूरकराने किमान आपल्या वया एवढी झाडे लावायला हवीत, असा सल्ला संवेनशील अभिनेते आणि निसर्ग प्रेमी सयाजी शिंदे(Sayaji Shinde) यांनी नागपूरकरांना दिला. नागपूरचे सुपुत्र, दिवंगत अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचा शेवटचा चित्रपट असलेल्या ‘२६ नोव्हेंबर’ या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी नागपूर आणि नागपूरच्या तापमानाबाबत त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करीत नागपूरकरांना सल्ला दिला. यावेळी प्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर, अनिकेत विश्वासराव, डॉ. विलास उजवणे यांच्या पत्नी अभिनेत्री अंजली उजवणे, अभिनेत्री डॉ. जुई जवादे यांच्यासह दिग्दर्शक सचिन उराडे, निर्माते निलेश ओंकार, अनिल जवादे यांची प्रमुख उपस्थिती होती. या चित्रपटाचे ७५ टक्के चित्रीकरण नागपूर परिसरात करण्यात आले असून बहुतांश दृश्य ससेगाव झोपडपट्टीतील आहे.
प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे(Sayaji Shinde) पर्यावरण विषयक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्था, संघटनांशी जोडल्या गेले आहे. यानिमित्त ते नागपूर जवळील पेंच, उमरेड कऱ्हाडला, ताडोबा यासह अन्य जंगल परिसराला भेटी देत असतात. यामुळे, अनेकदा त्यांचे नागपूरला येणे होते. नागपूरमध्ये सिमेंटीकरण खूप झाले आहे. याचा परिणाम निश्चितच तापमानवर होत असल्याचे सयाजी शिंदे म्हणाले. आता जुलै महिना येताच आपण वृक्षारोपण आणि त्याविषयीच्या जनजागृतीबद्दल बोलते होऊ. परंतु, वर्षभर पर्यावरण आणि तापमान वाढ रोखण्यासाठी आपण काय करतो, असा परखड प्रश्न देखील त्यांनी केला. यावर एकच उपाय असून प्रत्येकाने किमान आपल्या वया एवढी झाडे लावायला हवी आणि त्याची निगा राखायला हवी, असेही त्यांनी नमूद केले. पत्रकार परिषदेला नागपूरमधील ज्येष्ठ कलावंत प्रभाकर अंबोणे, वत्सला अंबोणे, अभिनेता नीरज जांगडे (मायकल) यांच्यासह अनेक कलावंत उपस्थित होते.
अभिनेत्यांचे दीक्षाभूमीला वंदन
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखोंच्या संख्येत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, त्या नागपुरातील पवित्रस्थळी चित्रपटातील अभिनेत्यानी भेट देऊन बाबासाहेबांना अभिवादन केले. यावेळी प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे, विजय पाटकर, अनिकेत विश्वासराव, अंजली उजवणे, अभिनेत्री डॉ. जुई जवादे यांच्यासह चित्रपटातील कलावंत हजर होते.
प्रत्येक नागपूरकराने किमान आपल्या वया एवढी झाडे लावायला हवीत : सयाजी शिंदे
Good https://lc.cx/xjXBQT
Good https://urlr.me/zH3wE5