भात सोडायची गरज नाही! फक्त खाण्याची पद्धत बदला, वजन आणि शुगर राहतील नियंत्रणात

Rice- is-dangerous : वजन वाढण्याची भीती असो वा शुगर लेव्हलची चिंता, अनेकजण सर्वप्रथम भात वर्ज्य करतात. विशेषतः मधुमेहींसाठी भात म्हणजे शत्रूच, असा समज आहे.
मुंबई : अनेकांना वाटते की वजन कमी करायचे किंवा शुगर नियंत्रणात ठेवायची असेल तर भात पूर्णपणे सोडावा लागतो. पण तज्ज्ञ सांगतात की भात सोडण्याची गरज नाही, फक्त खाण्याची पद्धत बदलली तरी परिणाम दिसून येतो.

प्रसिद्ध पोषणतज्ञांनी या कल्पनेला आव्हान दिले (Rice- is-dangerous)

या समजुतीला प्रसिद्ध पोषणतज्ञ दीपशिखा जैन यांनी त्यांच्या इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये आव्हान दिले आहे. योग्य पद्धतीने शिजवून खाल्ल्यास मधुमेही आणि वजन कमी करू इच्छिणारे लोक भाताचा आनंद घेऊ शकतात, असे त्या म्हणाल्या.

भात खलनायक नाही, तर स्वयंपाकाची पद्धत जबाबदार आहे.

दीपशिखा जैन यांच्या मतानुसार, भात रक्तातील साखर वाढवण्यास थेट जबाबदार नाही. भात कसा शिजवला जातो, यावर तो शरीरात कसा पचतो आणि त्यावर शरीर कशी प्रतिक्रिया देतं हे अवलंबून असतं. योग्य पद्धतीने शिजवलेला भात फायबरचा चांगला स्रोत ठरू शकतो. त्यामुळे, स्वयंपाकाच्या पद्धतीत बदल करून भातातील पोषक घटक वाढवता येतात.

ताजे शिजवलेले तांदूळ धोकादायक का आहे?( Why is rice dangerous?)

ताजे शिजवलेले तांदूळ आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात. पोषणतज्ञांच्या नुसार, तांदूळ (Rice)शिजल्याबरोबर खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते, कारण त्यात स्टार्चचे प्रमाण अधिक असते आणि ते लवकर ग्लुकोजमध्ये रूपांतरित होते.

जास्त कॅलरीज असतात(More calories)

तांदूळामध्ये उच्च कॅलरी असल्यामुळे ते वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण करते. त्यामुळे मधुमेह, पूर्व-मधुमेह किंवा लठ्ठपणा असलेल्या व्यक्तींसाठी ताजे भात खाणे आरोग्यास हानिकारक ठरू शकते.

भात खाण्याची योग्य पद्धत

पोटभर नव्हे तर मर्यादित प्रमाणात : भाताचे प्रमाण कमी करून त्यासोबत भाज्या, डाळी, सॅलड(Salad) यांचा समावेश करावा.
तांदळाचा प्रकार महत्त्वाचा : पांढऱ्या तांदळाऐवजी ब्राउन राईस(Brown rice), लाल तांदूळ किंवा हातसडीचा तांदूळ वापरल्यास फायबर(Fiber) अधिक मिळते.

थंड झालेला भात : शिजवलेला भात थंड झाल्यावर त्यातील रेझिस्टंट स्टार्च(Resistant starch) वाढतो, ज्यामुळे शुगर हळूहळू वाढते आणि वजन नियंत्रणात राहते.
• भातासोबत प्रोटीन : भात खाताना डाळ, कडधान्ये, पनीर किंवा मासे यांचा समावेश केल्यास रक्तातील साखर स्थिर राहते.
आरोग्य फायदे
• वजन कमी करण्यास मदत
• रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात
• पचन सुधारते
• दीर्घकाळ तृप्तीची भावना मिळते

तज्ज्ञांचे मत

आहारतज्ज्ञ सांगतात की, “भात हा भारतीय आहाराचा अविभाज्य भाग आहे. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खाल्ल्यास तो आरोग्यास हानीकारक ठरत नाही.”

Social Media