‘O’-Romeo-Box-Office : तिसऱ्या दिवशी शाहिदचा कोविडनंतरचा सर्वात मोठा चित्रपट, TBMAUJ ला टाकले मागे.

‘O’-Romeo-Box-Office : ओ’ रोमियो’ने बॉक्स ऑफिसवर पहिल्या तीन दिवसांत ३०.१५ कोटींची कमाई केली. Sacnilk च्या माहितीनुसार, विशाल भारद्वाज दिग्दर्शित आणि शाहिद कपूर-तृप्ती दिमरी(Tripti-Dimri)  यांच्या चित्रपटाने कोविड(Covid) काळात प्रदर्शित झालेल्या TBMAUJ ला मागे टाकून शाहिद कपूरच्या चित्रपटांमध्ये सर्वात मोठी ओपनिंग वीकेंड कमाई केली आहे.

रोमँटिक थ्रिलरने भारतात ८.५ कोटी रुपयांची कमाई करत, शाहिदसाठी महामारीनंतरचा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला आहे. यापूर्वी, ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ (२०२४) या चित्रपटाने पहिल्या दिवशी ६.७ कोटी आणि पहिल्या वीकेंडमध्ये २७.१ कोटी रुपये कमावले होते.

ओ’रोमिओ’चे तीन दिवसांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन:(‘O’-Romeo-Box-Office)

Sacnilk नुसार, चित्रपटाने शुक्रवारी रु. 8.5 कोटी, शनिवारी रु. 12.65 कोटी आणि रविवारी रु. 9 कोटींची कमाई केली,Total एकूण कलेक्शन रु. 30.15 कोटी झाले आहे.

हुसैन झैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’वर आधारित या चित्रपटात नाना पाटेकर(Nana Patekar), अविनाश तिवारी, विक्रांत मॅसी(Vikrant Massey) आणि तमन्ना भाटिया(Tamanna Bhatia) यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश आहे. समीक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिली असली तरी, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

आता सोमवारपासून चित्रपटाची खरी परीक्षा सुरु होईल, आठवड्याच्या दिवसांमध्ये तो कसा प्रतिसाद देतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Social Media