’26 नोव्हेंबर’ चित्रपट म्हणजे दीक्षाभूमीला वाहिलेले फूल

नागपूर :  ’26 नोव्हेंबर’ (26-November)हा चित्रपट म्हणजे दीक्षाभूमीला वाहिलेले आदराचे फूल आहे, असे भावोद्वार प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे(Sayaji Shinde) यांनी येथे काढले. 26 नोव्हेंबर या चित्रपटानिमित्त आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. चित्रपटाचे 75 टक्के शूटिंग नागपूर परिसरात झाले असून महत्वाचा भाग ससेगाव झोपडपट्टीत चित्रित केला आहे. अनिलकुमार जवादे आणि निलेश ओंकार निर्मित 26 नोव्हेंबर हा संविधानावर आधारित चित्रपट 9 मे रोजी रिलीज होत आहे. या चित्रपटात हसत, खेळत, रंजक पद्धतीने संविधानाची मूळ भावना मांडण्यात आली आहे.

आजही समाजमन बऱ्यापैकी गढूळ आहे, महापुरुषांवरून वाद घडत आहे पण महनीय व्यक्तींना जातीधर्मात बांधू नये, त्यांचे विचार अंगीकारावे, असे सचिन उराडे म्हणाले. चित्रपटाचे 75 टक्के शूटिंग नागपूर परिसरात झाले असून, म्हत्वाचा भाग ससेगाव झोपडपट्टीत चित्रित केला. जम्बुद्विप प्रोडक्शनचा हा पहिला चित्रपट नागपूर भूमितलाही पहिला मोठा चित्रपट आहे, असे निलेश ओंकार म्हणाले. 15 ऑगस्ट, 26 जानेवारीप्रमाणे 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस साजरा करण्याची भावना रुजावी हा या चित्रपटनिर्मिती मागचा उद्देश असल्याचे जवादे यांनी स्पष्ट केले. विचारप्रवृत्त करणारा चित्रपट, असे वर्णन विजय पाटकर यांनी केले. ही माझ्या जीवनातील माईलस्टोन, समाजाचे प्रतिनिधित्व करणारी ताकदवर भूमिका आहे, असे अनिकेत विश्वासराव म्हणाले.

नवोदित अभिनेत्री जुई यांनीही चित्रपट प्रवासाची कथा उलगडली. डॉ. विलास उजवणे यांचा हा अखेरचा चित्रपट होय. प्रभाकर आंबोणे, वत्सला आंबोणे यांच्यासह नागपूरचे बरेच कलाकार या चित्रपटात आहे. यावेळी चित्रपटातील मुख्य कलाकार अनिकेत विश्वासराव, विजय पाटकर, डॉ. जुई जवादे, निर्देशक सचिन उराडे, निर्माते अनिलकुमार जवादे आणि डॉ. अंजली उजवणे उपस्थित होते.

Social Media

One thought on “’26 नोव्हेंबर’ चित्रपट म्हणजे दीक्षाभूमीला वाहिलेले फूल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *