Nagpur-Nitish-Bhardwaj : 14 मार्च 2026 रोजी अतुल सत्य कौशिक लिखित आणि दिग्दर्शित, प्रसिद्ध अभिनेते डॉ. नितीश भारद्वाज अभिनीत हिंदी मेगा ड्रामा “चक्रव्यूह” सादर होणार आहे. महाभारतातील चक्रव्यूह अध्यायाला एका नव्या दृष्टिकोनातून, सखोल अर्थ आणि धड्यांसह रंगमंचावर प्रस्तुत करण्याचा हा प्रयत्न आहे. ‘चक्रव्यूह’ भगवद्गीतेतील कालातीत ज्ञानाला उजाळा देणारे, धर्म, कर्म आणि नैतिक आचरणासारख्या सनातन हिंदू धर्माच्या तत्त्वांना प्रोत्साहन देणारे एक प्रभावी नाटक आहे. (Nitish-Bhardwaj)
प्रसिद्ध महाभारत (Mahabharata)मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका अजरामर करणारे डॉ. नितीश भारद्वाज या नाटकातून पुन्हा एकदा प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील. ‘चक्रव्यूह’चे आतापर्यंत 150 हून अधिक प्रयोग यशस्वी झाले आहेत.
महोत्सवात प्रवेश विनामूल्य आहे. दक्षिण मध्य विभागीय सांस्कृतिक केंद्र नागपूरच्या संचालिका श्रीमती आस्था कार्लेकर यांनी सर्व रसिक आणि कलाप्रेमींना दुसऱ्या दिवशी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महोत्सवाचा आनंद घेण्याचे आवाहन केले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता शेलगावकर यांनी केले. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी रसिकांची उस्फूर्त उपस्थिती होती. कलाप्रेमींनी कलाकारांच्या सादरीकरणाला टाळ्यांच्या गजरात भरभरून दाद दिली. सांस्कृतिक उत्साहात आणि लोकसहभागाने महोत्सवाची शानदार सुरुवात झाली.