मुंबई : NEET-UG 2024 परीक्षेच्या पेपर लीक प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. देशभरातील 250 विद्यार्थ्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला असून 14 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले आहेत.
गेल्या वर्षी, 2024 मध्ये झालेल्या NEET-UG परीक्षेच्या पेपर लीक प्रकरणाने देशभरात खळबळ उडवली होती. विविध भागांमध्ये पेपर लीक झाल्याचे उघड झाल्यानंतर राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीने तत्काळ चौकशी सुरू केली.
तपासाच्या अनुषंगाने देशभरातील सुमारे 250 विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली असून, वैद्यकीय अभ्यासक्रमातील प्रथम वर्षाच्या MBBS प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या 14 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले आहेत. तसेच 62 विद्यार्थ्यांना तीन वर्षांसाठी NEET परीक्षेतून निलंबित करण्यात आले आहे.
या कठोर कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली असून परीक्षेच्या विश्वासार्हतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. पुढील तपास चालू असून याप्रकरणी दोषींवर आणखी कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.
शिक्षण मंत्रालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून सीबीआयकडे अधिकृत चौकशी सोपवण्यात आली आहे. बिहारच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOU) केलेल्या तपासात हजारीबाग येथील ओएसिस स्कूलमधून पेपर लीक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
5 मे रोजी मिळालेल्या इनपुटनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत 13 जणांना अटक केली . त्यानंतर 10 मे रोजी बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे हाती घेतली. 21 मे रोजी NTA ला 11 विद्यार्थ्यांची माहिती आणि त्यांच्या उत्तरपत्रिका मागवण्यात आल्या
या प्रकरणामुळे देशभरात विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून परीक्षेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शिक्षण मंत्रालयाने आश्वासन दिले आहे की यापुढे अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येतील.
ही घटना विद्यार्थ्यांसाठी धक्कादायक असून परीक्षेच्या विश्वासार्हतेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. पुढील तपास सुरू असून अधिक दोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.
इतिहासाच्या पुस्तकातून मुघल इतिहास हटवला ; भारतीय राजवंशांवरील प्रकरणांचा समावेश