मूर्तिजापूरजवळ लोखंडी पाईपांच्या वजनाखाली दोन तरुणांचा मृत्यू; महामार्गावर मध्यरात्रीचा भीषण अपघात

Murtijapur-Akola-News : लोखंडी पाईपांच्या वजनाखाली दोन जीव चिरडले; मूर्तिजापूरजवळ महामार्गावर नेमकं काय घडलं? काळजाचा थरकाप उडवणारा अपघात…

मूर्तिजापूर(अकोला) : नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर मूर्तिजापूरजवळ दिनांक ७ फेब्रुवारी शुक्रवारी रोजी मध्यरात्री भीषण अपघात झाला. लोखंडी पाईपांनी भरलेला ट्रक दरीत कोसळल्याने दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे बुलढाणा(Buldhana) शहरात आणि मृतांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

अपघाताची घटना (Murtijapur-Akola-News)

मिळालेल्या माहितीनुसार, आयशर ट्रक (क्र. MH-29-BF-6074) नागपूरकडून संभाजीनगरच्या दिशेने जात होता. कुरुम शिवारातील तीन पुलाजवळ चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. ट्रक वेगाने डिव्हायडर ओलांडून विरुद्ध दिशेला गेला आणि थेट पुलालगत असलेल्या खोल दरीत कोसळला.

मृत्यूचा क्षण

दरीत कोसळताना ट्रकमधील जड लोखंडी पाईप (Iron-pipe)केबिनमध्ये घुसले. हेच पाईप चालक अनिसउद्दीन रफिकउद्दीन काझी आणि क्लिनर मोहम्मद रेहान मोहम्मद नाजिम यांच्या अंगावर कोसळले. पाईपांच्या प्रचंड वजनाखाली चिरडले गेल्यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला. हे दोघे जोहर नगर, बुलढाणा येथील रहिवासी होते.

पोलिसांची धावपळ

अपघाताचा आवाज ऐकून नागरिकांनी माना पोलिसांना माहिती दिली. ठाणेदार गणेश नावकार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या साहाय्याने ट्रक व पाईप बाजूला करून मृतदेह बाहेर काढण्यात आले. या प्रक्रियेदरम्यान महामार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी ती सुरळीत केली.

प्राथमिक तपास

अतिवेग किंवा चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

शोककळा

या दुर्घटनेमुळे बुलढाणा शहरात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हेही वाचा :अकोला जिल्ह्यात भीषण आग व स्फोट : डिझेल साठ्यामुळे तिघांचा मृत्यू, गावात शोककळा

Social Media