Maratha-Tourism-Train: छत्रपती शिवाजी महाराज आणि गौरवशाली मराठा पर्यटन ट्रेन ९ जून २०२५ पासून सुरू होत आहे. भारतीय रेल्वेच्या या विशेष उपक्रमामुळे पर्यटकांना शिवनेरी, रायगड, प्रतापगड आणि पन्हाळगड यांसारख्या ऐतिहासिक किल्ल्यांना भेट देण्याची संधी मिळणार आहे.
प्रवासाचा कालावधी आणि सुविधा(Maratha-Tourism-Train)
- प्रवासाचा कालावधी: ६ दिवस
- स्थानके: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे
- प्रवास श्रेणी: स्लीपर, एसी तृतीय श्रेणी, एसी द्वितीय श्रेणी
- हॉटेलमध्ये मुक्कामाची सुविधा
पर्यटन स्थळांचा समावेश(Maratha-Tourism-Train)
या विशेष ट्रेनच्या माध्यमातून पर्यटकांना शिवनेरी किल्ला, रायगड, पुण्यातील लाल महाल, कसबा गणेश मंदिर, भीमाशंकर ज्योतिर्लिंग, प्रतापगड, कोल्हापूरची अंबाबाई मंदिर आणि पन्हाळगड यांसारख्या ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांना भेट देता येणार आहे.
विशेष यात्रा पॅकेज
‘आईआरसीटीसी’द्वारे संचालित भारत गौरव टुरिस्ट ट्रेन या उपक्रमांतर्गत मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाचा अनुभव घेता येणार आहे. पर्यटकांना शिवरायांच्या जन्मस्थळापासून राज्याभिषेक स्थळांपर्यंतचा प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.
या ऐतिहासिक प्रवासाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी लवकरात लवकर बुकिंग करावे!
मराठा पर्यटन ट्रेन ही विशेष रेल्वे ९ जून २०२५ पासून सुरु होत असून, ती ६ दिवसांच्या प्रवासात पर्यटकांना #महाराष्ट्रातील अनेक ऐतिहासिक किल्ले व धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी देणार आहे. या ट्रेनचा उद्देश मराठा साम्राज्याचा गौरवशाली इतिहास दाखवणे हा आहे.
या ६ दिवसांच्या प्रवासात भेट देण्यात येणारी ठिकाणे:
1. #छत्रपती_शिवाजी_महाराज_टर्मिनस/दादर/ठाणे – येथून ट्रेनचा प्रारंभ
2. #रायगड_किल्ला
3. #पुणे परिसर
लाल महाल
#कसबा गणेश मंदिर
#शिवसृष्टी_प्रकल्प
4. #शिवनेरी_किल्ला – शिवाजी महाराजांचे जन्मस्थान
5. #भीमाशंकर_ज्योतिर्लिंग मंदिर
6. #प्रतापगड_किल्ला
7. #पन्हाळगड_किल्ला
8. #कोल्हापूर – करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर
विशेष वैशिष्ट्ये:
IRCTC कडून यात्रा पॅकेजसह ट्रिप
प्रवासादरम्यान गाईड व माहितीपर सत्र
ऐतिहासिक स्थळांची प्रत्यक्ष भेट
Maratha Tourism Train to Begin on June 9
Mumbai: The Chhatrapati Shivaji Maharaj and Glorious Maratha Tourism Train is set to commence operations on June 9, 2025. This special initiative by Indian Railways will allow tourists to visit historic forts like Shivneri, Raigad, Pratapgad, and Panhala.
Travel Duration and Facilities
- Duration: 6 days
- Stations: Chhatrapati Shivaji Maharaj Terminus, Dadar, Thane
- Travel Classes: Sleeper, AC Third Class, AC Second Class
- Accommodation: Hotel stays included
Included Tourist Destinations
Passengers will get the opportunity to visit Shivneri Fort, Raigad, Lal Mahal in Pune, Kasba Ganesh Temple, Bhimashankar Jyotirlinga, Pratapgad, Kolhapur’s Ambabai Temple, and Panhala Fort.
Special Travel Package
Under the Bharat Gaurav Tourist Train initiative by IRCTC, travelers will experience the legacy of the Maratha Empire, from Shivaji Maharaj’s birthplace to his coronation sites.
Bookings are now open for this historic journey!
You can find more details here.