महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार!!

मुंबई :  होय, ही विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे! (Maharashtra-SSC-Result-2025)महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल उद्या, १३ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे. त्याआधी सकाळी ११ वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होणार आहे, जिथे राज्याचा एकूण निकाल, मुली आणि मुलांचे उत्तीर्ण प्रमाण, तसेच जिल्हानिहाय आकडेवारी जाहीर केली जाईल.

विद्यार्थी mahresult.nic.in, sscresult.mkcl.org, आणि sscresult.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळांवर निकाल पाहू शकतात. तसेच, SMS द्वारेही निकाल मिळवता येईल—फक्त MHSSC तुमचा सीट क्रमांक टाइप करून 57766 वर पाठवा, आणि तुम्हाला तुमच्या निकालाची माहिती मिळेल.

यंदा निकाल लवकर जाहीर होत असल्याने पुनर्परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा लवकर घेतली जाणार आहे. तसेच, अकरावीच्या प्रवेश प्रक्रियाही पूर्णपणे ऑनलाइन होणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉलेजच्या फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर होणार आहे.

उद्या दुपारी 1 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल. काही दिवसांपूर्वीच बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता.  तेव्हापासूनच दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना निकालाची उत्सुकता लागली होती. ही प्रतीक्षा अखेर संपली आहे.(Maharashtra-SSC-Result-2025)

उद्या दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना बोर्डाच्या आणि अन्य संकेतस्थळांवर आपला निकाल पाहता येईल. त्यानंतर आपापल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल.

दरम्यान, दहावीची निकाल लागल्यानंतर विद्यार्थी आणि पालक यांची अकरावीच्या प्रवेशासाठी अनेक कॉलेजच्या खेटी घालाव्या लागतात. विद्यार्थी आणि पालक यांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र बोर्डानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र बोर्डानं यंदा अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबची माहिती बोर्डानं एक प्रसिद्धीपत्रक जारी करून यापूर्वीच दिली आहे.

तुम्ही निकालाची वाट पाहत आहात का? कोणत्या विषयात सर्वाधिक गुण मिळतील, असा अंदाज आहे? 


महाराष्ट्र बोर्डाचा 12 वी निकाल 2025: राज्याचा निकाल 91.88 टक्के,

Social Media