मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज, 5 मे 2025 रोजी 12 वीचा निकाल जाहीर केला आहे. 91.88% नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
तुम्ही तुमचा निकाल mahahsscboard.in, hscresult.mkcl.org, किंवा results.digilocker.gov.in या अधिकृत वेबसाइट्सवर पाहू शकता. निकाल पाहण्यासाठी तुम्हाला तुमचा रोल नंबर आणि आईचे पहिले नाव प्रविष्ट करावे लागेल.
राज्यात बारावीचा निकाल 91.88 टक्के राज्यातील पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळातून एकूण 14 लाख 87 हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेत नोंदणी केली होती.
त्यापैकी 13 लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 91.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान, यंदा निकालाचा टक्का घसरला आहे. फेब्रुवारी मार्च 2024 चा निकाल 93.37 टक्के लागला होता तर, फेब्रुवारी मार्च 2025 चा निकाल 91.88 टक्के लागला. त्यामुळे यंदा महाराष्ट्र बोर्डाच्या 12 वीच्या परीक्षेचा निकाल 1.49 टक्क्याने घसरला आहे. बारावीच्या निकालात यंदाही मुलींची बाजी यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे.