मुंबई : M-Chinnaswamy-Stadium : बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर(M. Chinnaswamy Stadium) आरसीबीच्या विजय सोहळ्यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आणि ३३ जण जखमी झाले. या दुर्दैवी घटनेनंतर आरसीबीने अधिकृत निवेदन जारी करत शोक व्यक्त केला. अभिनेत्री अनुष्का शर्मा(Anushka Sharma) हिनेही आपल्या इंस्टाग्रामवर संघाच्या निवेदनासह हृदयद्रावक इमोजी शेअर करत दुःख व्यक्त केले.
नेटकरी अनुष्काच्या प्रतिक्रियेवर नाराज(M-Chinnaswamy-Stadium)
मात्र, काही नेटकऱ्यांनी अनुष्काच्या प्रतिक्रियेवर नाराजी व्यक्त केली. त्यांनी तिच्यावर टीका करत म्हटले की, “केवळ इमोजी शेअर करून जबाबदारी संपत नाही,” तर काहींनी आरसीबीच्या आयोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
कर्नाटक सरकारने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून, आरसीबी आणि कर्नाटक क्रिकेट संघटनेने पीडित कुटुंबांना २५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
बंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये कर्नाटक सरकारद्वारे आरसीबीच्या खेळाडूंचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी स्टेडियमबाहेर हजारो क्रिकेटप्रेमींनी गर्दी केली होती. मात्र या गर्दीचे स्वरुन चेंगराचेंगरीने घेतले. यामध्ये अनेक जखमी झाले तर ११ जणांचा मृत्यू झाला. याचसंदर्भात अनुष्काने एक पोस्ट शेअर केली. मात्र ही पोस्ट शेअर करताच तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. अनुष्काला नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं आहे.चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत जवळपास ११ जणांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर अनुष्का शर्मा चांगलीच ट्रोल होत आहे
संतापजनक कमेंट
अनुष्का म्हणाली की, “चेंगराचेंगरीत झालेल्या नुकसानाबाबत आरसीबी दुःख व्यक्त करत आहे. तसेच या घटनेमुळे ज्या कुटुंबियांचं नुकसान झालं त्याची आम्हाला जाणीव आहे. परिस्थिती नक्की काय आहे? हे समजताच आम्ही कार्यक्रम थांबवला.
स्थानिक प्रशासनाशी संवाद साधला. तसेच त्यांनी दिलेल्या गाइडलाइन्सनुसार पुढे आम्ही सगळं फॉलो करत गेलो”. तिच्या याच पोस्टवर अनेकांनी संतापजनक कमेंट केल्या आहेत.
During the Royal Challengers Bengaluru (RCB) victory celebrations outside M. Chinnaswamy Stadium in Bengaluru, a tragic stampede claimed 11 lives and left 33 people injured. Following the incident, RCB issued an official statement expressing their grief and condolences. Actress Anushka Sharma, who is married to RCB star Virat Kohli, also shared the team’s statement on her Instagram, accompanied by heartbroken emojis to express her sorrow. The tragedy has overshadowed what was meant to be a historic moment for RCB and its fans.