लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झाले की नाही? जाणून घ्या 4 सोपे मार्ग!

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा झाली आहे की नाही, हे तपासण्यासाठी चार सोपे मार्ग आहेत:

1️⃣ बँकेकडून SMS:

  • जर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले असतील, तर बँकेकडून SMS येतो.
  • हा संदेश तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर येतो.
  • तुम्ही तुमच्या बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करून तुमच्या बँकेत जमा झालेली रक्कम विचारू शकता.
  • तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले असतील तर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर तुम्हाला मेसेज येईल. हा मेसेज आलेला आहे का? ते चेक करा

2️⃣ बँकेच्या टोल-फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल:

  • तुमच्या बँकेच्या टोल-फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास, तुम्हाला खात्यातील शिल्लक आणि जमा झालेल्या रकमेची माहिती मिळेल.

3️⃣ नेट बँकिंग किंवा UPI अ‍ॅप्स:

  • Google Pay, PhonePe, Paytm किंवा बँकेच्या अधिकृत अ‍ॅपद्वारे तुम्ही तुमच्या खात्यातील रक्कम तपासू शकता.
  • नेट बँकिंगच्या मदतीनेही तुम्ही ट्रान्झॅक्शन हिस्ट्री पाहू शकता.
  •  तुम्ही ऑनलाईन बँकिंग किंवा बँकेच्या अॅपच्या माध्यमातून बँक स्टेटमेंट डाऊनलोड करून तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले आहेत की नाही? हे तपासू शकता.

4️⃣ ATM किंवा बँकेत प्रत्यक्ष भेट:

  • डेबिट कार्ड वापरून ATM मध्ये बॅलन्स चेक करू शकता.
  • तसेच, बँकेत जाऊन खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही, याची खात्री करू शकता.
  • तुम्ही ऑनलाईन बँकिंग वापरत नसाल तर प्रत्यक्ष बँकेत जाऊनही तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत की नाही, हे तपासू शकता

लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम जमा झाली आहे की नाही, हे तपासण्यासाठी या सोप्या पद्धतींचा वापर करा!


 

Best Crime Thriller of 2020: निर्घृण हत्या, चक्रावणारा सस्पेन्स आणि नवाजुद्दीन-राधिकाची जबरदस्त जोडी!

Social Media