पत्रकारितेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी ज्येष्ठ पत्रकार किशोर आपटे यांना पुरस्कार प्रदान

मुंबई : मुंबई मंत्रालय विशेष प्रतिनिधी व ज्येष्ठ पत्रकार किशोर आपटे(Kishor-Apte) यांना मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाचा पत्रकारितेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जाणारा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे विधिमंडळ वार्ताहर संघ व पत्रकार संघाचे पदाधिकारी दिलीप सपाटे, दीपक भातुसे यासह सर्वांनी अभिनंदन केले आहे.

मिडिया असोसिएशन ऑफ इंडिया (माई) च्या अध्यक्षा शीतल करदेकर आणि सरचिटणीस चेतन काशीकर यांच्या हस्ते उत्कृष्ट पत्रकारिता एक्सलन्स अॅवॉर्ड स्विकारताना ज्येष्ठ पत्रकार किशोर आपटे यांच्यासोबत मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे कार्यवाह दिपक भातुसे, कार्यकारिणी सदस्य खंडुराज गायकवाड, माजी अध्यक्ष प्रविण पूरो, ज्येष्ठ सदस्य विलास मुकादम उपस्थित होते.

मुंबई मंत्रालयाचे विशेष प्रतिनिधी आणि ज्येष्ठ पत्रकार किशोर आपटे यांना पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल मीडिया असोसिएशन ऑफ इंडियातर्फे “उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार” प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार त्यांच्या दीर्घकालीन, सखोल आणि जबाबदारीने पार पाडलेल्या पत्रकारितेच्या कार्याची पावती आहे.

या गौरवप्राप्त क्षणानंतर मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ तसेच मंत्रालय प्रतिनिधी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी किशोर आपटे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांच्या कार्यशैलीतली स्पष्टता, वस्तुनिष्ठता आणि सामाजिक भान यामुळेच ते पत्रकारितेच्या क्षेत्रात एक आदर्श ठरले आहेत.

यापूर्वी सन २०२२चा मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचा राज्यस्तरावरील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारही आपटे यांना प्राप्त झाला आहे. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर आणि कार्यवाह प्रमोद डोईफोडे यांनी त्यासाठी त्यांची निवड केली होती. पुरस्कार निवड समितीमध्ये किरण नाईक, अनिकेत जोशी आणि मिलिंद लिमये यांचा सहभाग होता. तर पुरस्कार वितरण तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले होते.

संवाद मिडिया #जनमनाचा संवाद..! च्या संपूर्ण टीमकडून ज्येष्ठ पत्रकार किशोर आपटे यांचे मन:पूर्वक अभिनंदन! हा सन्मान केवळ किशोर आपटे यांच्यासाठीच नव्हे, तर महाराष्ट्रातील जबाबदार पत्रकारितेच्या परंपरेचा गौरव करणारा ठरतो. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

 

Social Media