Gold-silver-purchase : सोनं-चांदी खरेदीची योग्य वेळ आहे का? उच्चांकी दरावरून घसरण झाल्यावर नवीनतम भाव जाणून घ्या. सोन्या-चांदीच्या दरात मोठी अस्थिरता दिसून येत आहे. मागील काही दिवसांत मोठी घसरण झाल्यानंतर, गेल्या दोन दिवसांत दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये वाढ झाली आहे. भारतीय गुंतवणूकदारांसाठी सोने आणि चांदी हे नेहमीच सुरक्षित गुंतवणूक मानले जातात.
मात्र, अलीकडील किमतींमधील चढ-उतारांमुळे गुंतवणूकदार संभ्रमात आहेत. काही दिवसांपूर्वी सोन्या-चांदीने उच्चांक गाठला होता. जानेवारीच्या अखेरीस, एमसीएक्सवर सोन्याने १.९३ लाख आणि चांदीने ४.२० लाखांची पातळी गाठली होती. त्यानंतर गुंतवणूकदारांनी नफा बुक करण्यास सुरुवात केल्याने दरात घसरण झाली.
सोने-चांदी खरेदीची योग्य वेळ आली का? (Gold-silver-purchase)
सोमवारी सोन्याचा भाव १.३७ लाख रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत घसरला, तर चांदी २.२५ लाखांच्या आसपास पोहोचली. काही दिवसांत मोठी घसरण झाल्याने गुंतवणूकदारांना हा धक्का होता. मात्र, नंतर बाजार सुधारला आणि दोन दिवसांत सोने आणि चांदीच्या भावात जोरदार वाढ झाली.
बुधवारी सायंकाळपर्यंत एमसीएक्सवर सोन्याचा भाव १.५९ लाख रुपये, तर चांदीचा भाव २.८९ लाख रुपये होता.
दोन दिवसांत सोन्याचा भाव २२ हजार रुपयांनी, तर चांदीचा भाव सुमारे ६४ हजार रुपयांनी वाढला. तरीही, सोने विक्रमी उच्चांकापेक्षा ३४ हजार रुपयांनी, तर चांदी १.३० लाख रुपयांनी कमी आहे.
तज्ज्ञांच्या मते, ही घसरण तात्पुरती होती. प्रॉफिट बुकींग आणि डॉलरच्या मजबुतीमुळे कमोडिटीच्या किमतींवर दबाव आला. जागतिक बाजारातील अनिश्चितता आणि व्याजदरांच्या अंदाजांचाही परिणाम झाला.
दीर्घकालीन दृष्टीने सोने आणि चांदी अजूनही मजबूत आहेत. महागाई, जागतिक तणाव आणि आर्थिक अनिश्चितता यामुळे मागणी कायम राहील. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदार हळू हळू खरेदी करू शकतात. अल्पकालीन गुंतवणूकदारांनी सावध राहावे. बाजारात चढ-उतार दिसू शकतात. घट होत असताना टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे (‘बायिंग ऑन डिप’) फायद्याचे ठरू शकते. पोर्टफोलिओपैकी १० ते २० टक्के सोने आणि चांदीमध्ये ठेवल्यास जोखीम कमी होण्यास मदत होईल.
चांदीचा दर:
चांदीचा दर: भारत-अमेरिका व्यापार करारानंतर चांदीच्या दरात वाढ झाली आहे. 3 फेब्रुवारी 2026 रोजी चांदीच्या किंमतीत वाढ झाली, याचे कारण 2 फेब्रुवारी रोजी झालेला भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार आहे. या करारामुळे सराफा बाजारात तेजी आली आहे.
दिल्लीत चांदीचा भाव
आज दिल्ली आणि मुंबईमध्ये चांदीचा दर 2,999 रुपये प्रति 10 ग्रॅम, 29,990 रुपये प्रति 100 ग्रॅम आणि 2,99,900 रुपये प्रति किलोग्राम आहे. चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद, पुणे, वडोदरा आणि अहमदाबादमध्येही दर जवळपास सारखेच आहेत. तज्ञांच्या मते, भारत-अमेरिका व्यापार करार, अमेरिकन डॉलरची मजबूती आणि अमेरिका-इराणमधील तणाव कमी झाल्यामुळे चांदीच्या दरावर दबाव आहे.
गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या दरात घसरण होत आहे. 2 फेब्रुवारी रोजी दिल्लीत चांदी 2.60 लाख रुपये प्रति किलोपर्यंत खाली आली. 29 जानेवारी 2025 रोजी चांदीचा भाव 4,04,500 रुपये प्रति किलो होता, जो आतापर्यंतचा उच्चांक आहे.
भारताला व्यापार संबंधाचा फायदा होतो?
अमेरिकेने भारतीय उत्पादनांवरील टॅरिफ 18 टक्क्यांपर्यंत कमी केल्याने, जागतिक निर्यात स्पर्धेत भारताला फायदा होत आहे. भारतापेक्षा इंडोनेशिया, व्हिएतनाम, बांगलादेश आणि चीनवर जास्त शुल्क आहे. रशियन तेलावरील 25 टक्के अतिरिक्त शुल्कही अमेरिकेने पूर्णपणे हटवले आहे, कारण भारताने रशियन तेलाच्या खरेदीबाबत काही वचनबद्धता दर्शवली आहे.