Assembly-debate : राज्य विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुस-या दिवशी विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या तासाला फलटण(Phaltan) येथिल डॉ संपदा मुंडे(Dr. Sampada Munde) मृत्यू प्रकरणी चर्चा झाली, याबाबत राज्य सरकार पिडीतेच्या कुटूंबियाना न्याय देण्यासाठी शासन कटीबध्द आहे अशी ग्वाही मुख्यमंत्र्यानी दिली. तर बेकायदा गुटखा विक्रीसारख्या गुन्ह्यात देखील मकोका सारख्या कायद्याव्दारे कारवाई करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यानी दिले. तर राज्यातील भटके कुत्रे, बिबटे, यांच्या उपद्रवाबाबतच्या प्रश्नावर लक्षवेधी सूचनेव्दारे चर्चा झाली. या शिवाय सचीव तुकाराम मुंडे(Tukaram Munde) यांच्या वतीने आमदार कृष्णा खोपडे (Krishna Khopade)यांना धमकी देण्यात आल्याबाबत मुद्दा उपस्थित करण्यातआला त्यानंतर सभागृह दहा मनिटांसाठी तहकूब करण्यात आले. विधेयके आणि नियम २९३अन्वये शेतक-यांच्या प्रश्नावर देखील चर्चा झाली. हेच आजच्या कामकाजाचे वैशिष्ट्य सांगता येईल.Assembly-debate
सकाळी दहा वाजता कामकाजाची सुरूवात प्रश्नोत्तरांच्या तासाने झाली. फलटण येथील शासकीय रूग्णालयातील डॉ संपदा मुंडे या डॉक्टरांच्या आत्महत्या प्रकरणात अमित साटम आणि अन्य अनेक सदस्यांनी तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी न्यायवैद्यक रसायन अहवालात सुसाईड नोट मयत डॉ मुंडे यांच्या हस्ताक्षरात झाल्याची पुष्टी मिळाल्याचे सांगितले. सदर डॉक्टरने काही प्रकरणात पाच महिन्यापूर्वी चुकीचे फिटनेस प्रमाणपत्र देण्यास मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे तसेच त्यांच्यावर पो अधिकारी बदने याने लैंगिक शोषण करून मानसिक दबाव टाकल्याचे स्पष्ट झाल्याचे ते म्हणाले. सदर प्रकरणात महिला सनदी अधिकारी नेमून न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशांच्या देखरेखीखाली चौकशि केली जातअसल्याचे ते म्हणाले, या प्रकरणात आता पर्यंत दिडशे जणांचे जबाब नोंदविण्यात आले असून विनाकारण राजकीय रंग दिला जात असल्याचे ते म्हणाले. या प्रश्नावर अनेक सदस्यानी चर्चेत भाग घेतला त्यात विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar), नाना पटोले(Nana Patole), प्रकाश सोळंके(Prakash Solanke),आदी सदस्यांचा समावेश होता.
राज्यात बनावट दिव्यांग प्रमाणपत्र व बदली प्रक्रियेतील अनियमितते बाबत बापू साहेब पाठारे आणिअन्य सदस्यांचा तारांकित प्रश्न होता. दिव्यांग(Disabled) विभागाचे मंत्रीअतुल सावे यांनी बनावट प्रमाणपत्र देणारांवर कठोर कारवाईचे आश्वासन यावेळी दिले. जानेवारी अखेर पर्यंत ही कार्यवाही पूर्ण करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.Assembly-debate
राज्यातील इतर मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी येत्या महिनाभरात उर्वरित पाच जिल्ह्यात जमिन उपलब्ध करून वसतीगृहांची व्यवस्था केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागाचे मंत्री अतुल सावे यांच्या या विभागातील कामाचे कौतुक करताना त्यांनी कमी कालावधीत चांगली कामगिरी केल्याचे सांगितले.
प्रशांत ठाकूर आणि अन्य सदस्यांनी राज्यातील अवेध गुटखा विक्री बाबत प्रश्न उपस्थित केला होता, त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यानी मकोका सारख्या कायद्यान्वये कारवईचे संकेत दिले.
प्रश्नोत्तरांच्या तासानंतर कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवण्याचे कामकाज पुकारण्यातआले. त्यात राज्य विमानतळ कंपनीचा सन २२ – २३ या वर्षाचा अहवाल, पावसाळीअधिवेशनातील आश्वासनांची पूर्त ता करण्याबाबत आश्वासन समितिचा अहवाल तापी तसेच कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचेअहवाल मांडण्यात आले. त्यानंतर स्थगन प्रस्तावाच्या सूचना दालनात नाकारण्यातआल्याची घोषणा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी केली. मात्र भास्कर जाधव यांनी मुंबई छशिट स्थानकावर शिवरायांच्या पुतळ्याची निर्मिती करण्याबाबतचे आश्वासन सभागृहात देवूनही कार्यवाही झाली नसल्याचे लक्षात आणून दिले, याबाबत नुतनीकरण करताना लक्ष देण्यात येत असल्याचे रेल्वे विभागाकडून कळविण्यात आल्याचे मुख्यमंत्र्याकडून सांगण्यात आले.
समाधान औताडे यांनी अध्यक्ष राहूल नार्वकर यांच्या नियक्तीला वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला.
अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी घोषणा करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील तीन विभागांचा कार्यभार अधिवेशन काळात मुख्यमंत्र्याच्या अनुमतीने अन्य मंत्र्याकडे देत असल्याची माहिती दिली, त्यात सामान्य प्रशासन विभागाचे कामकाज आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आल्याचे ते म्हणाले. भास्कर जाधव यांनी याबाबत आक्षेप नोंदविताना चुकीचा पायंडा पाडला जातअसल्याचे लक्षात आणून दिले. सामुहिक जबाबदारीचा भाग असला तरी अनेकदा मंत्री सभागृहात असतानाही अन्य मंत्र्याना उत्तरे देण्यास सांगण्यात येत असल्याने प्रश्नाला न्याय मिळत नसल्याचे ते म्हणाले. हा आक्षेप ग्राह्य असल्याचे सांगत अध्यक्षांनी देखील याबाबत आवश्यक खबरदारी सरकारने घ्यावीअशी सूचना केली.
त्यानंतर औचित्याच्या मुद्याव्दारे अनेक सदस्यांनी त्यांच्या मतदारसंघातील तातडीच्या महत्वाच्या प्रश्नावर सरकारला निवेदन करण्याबाबत मुद्दे मांडले. त्यात श्रीजया चव्हाण, राजेश वानखेडे, अशोक पाटील, विकास ठाकरे, शंकर माडेकर, अजय चौधरी, सत्यजीत देशमुख मोहन मते, निलेश राणे, सरोज अहिरे, बाबुराव कदम सिध्दार्थ खरात मुरजी काका पटेल इत्यादीअनेक सदस्यांनी आपले मुंद्दे मांडले.
त्यानंतर कृष्णा खोपडे या नागपूर शहर भागातील सदस्यांनी दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांच्या वतीने काही समर्थकांनी मोबईलवरून धमकी दिल्याचे प्रकरण मांडले. या विषयावर प्रविण दटके आणिअन्य सदस्यानी तिव्र भावना व्यक्त केल्या सत्ताधारी सदस्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे कामकाज दहा मिनीटे तहकूब करावे लागले. मुख्यमंत्र्यानी याबाबत चौकशी करून कारवई करण्याचे त्यानंतर आश्वासन दिले.
मुंबईत पवई येथे आर ए स्टुडियो येथे रोहित आर्या या राज्य सरकारच्या सल्लागाराने कथीत थकीत रकमेच्या वसुलीसाठी लहान बालकांनाओलीस ठेवण्याच्या घटनेत पोलीसांकडून त्याचा चकमकीत मृत्यू झाल्याप्रकरणी लक्षवेधी उपस्थित करण्यात आली. विजय वडेट्टीवार आणि अन्य सदस्यांनी हा शासकीय पांठिंब्याने पोलीसांनी केलेला खून असल्याचा आरोप केला. या प्रकरणी पोलीसांनी कारवाई करून अनेक चिमुकल्यांचा जीव वाचविल्याचे राज्यमंत्री भोयर यांनी सांगितले. या प्रकरणात तपास केला जात असल्याचे ते म्हणाले. दिलीप लांडे यांनी पोलीसांना बळीचा बकरा बनविले जात असल्याचा आरोप केला. सदर आर्या याने बेकायदा निधी संकलीत केल्याचे देखील राज्यमंत्री भोयर म्हणाले.
राज्यात भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्र्याकडे बैठक घेण्याचे आश्वासन महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिले. याबाबतच्या लक्षवेधीवर राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर सरकारने केलेल्या उपाय योजनांची माहिती दिली. भाजपचे महेश लांडगे यांनी भटक्या कुत्र्यांना प्राणिमित्र दया दाखवितात मात्र माणसांची त्यांना दया येत नसल्याचे सांगितले. सुनील प्रभू यांनी भटकी कुत्री मागे लागत असल्याने आमदारांना काम करता येत नसल्याचे सांगितले.अतुल भातखळ कर आणिअन्य सदस्यांची लक्षवेधी सूचना होती.
राज्यातील बिबट्यांच्या प्रश्नावर देखील बैठक घेण्याचे आश्वासन वनमंत्री गणेश नईक यांनी दिले. जितेंद्र आव्हाड आणि अन्य सदस्यांची लक्षवेधी सुचना होती.
त्यानंतर जमिनीचे तुकडे बंदी विधेयकाचे कामकाज घेण्यात आले.
हे समालोचन लिहून पूर्ण होत असताना सभागृहात या विधेयकावर सभागृहात चर्चा सुरू होती.(Assembly-debate)
विधानसभा समालोचन दि.९ डिसें २५
किशोर आपटे
