भारत-पाकिस्तान संघर्षानंतर युद्धविरामाची घोषणा; पंतप्रधान मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार

नवी दिल्ली : Announcement-ceasefire-India-Pakistan : भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या चार दिवसांच्या संघर्षानंतर युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत.

भारताने ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले होते, ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. या कारवाईत १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, ज्यामध्ये २०१९ च्या पुलवामा हल्ल्यातील आणि १९९९ च्या IC-814 विमान अपहरणातील प्रमुख आरोपींचा समावेश होता.(Announcement-ceasefire-India-Pakistan)

पाकिस्तानने त्यानंतर सीमेवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरू केले, ज्याला भारताने प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानच्या लष्करी तळांवर अचूक हल्ले करून प्रत्युत्तर दिले. अखेर १० मे रोजी भारत आणि पाकिस्तानच्या सैन्य अधिकाऱ्यांनी चर्चा करून युद्धविरामाचा निर्णय घेतला.

आजच्या पंतप्रधान मोदींच्या भाषणात राष्ट्रीय सुरक्षा, द्विपक्षीय संबंध आणि युद्धविरामानंतरच्या पुढील पावलांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. संपूर्ण देश या भाषणाची उत्सुकतेने वाट पाहत आहे.

तुम्हाला काय वाटतं, युद्धविरामानंतर भारताची पुढील रणनीती काय असावी? Announcement-ceasefire-India-Pakistan


Operation Sindoor : भारतीय सैन्यदलप्रमुखांना मोदी सरकारकडून फ्री हँड!!

Social Media