America-Rejects-₹4Crore-IndianMangoes : अमेरिकेने भारतातून पाठवलेल्या १५ आंब्यांच्या खेपा परत पाठवल्या आहेत, तर काही नष्ट केल्या आहेत. या खेपांची एकूण किंमत ४ कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे.
परत पाठवण्याचे कारण काय?
अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेडिएशन प्रक्रियेशी संबंधित कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्या होत्या. ही प्रक्रिया फळांमधील कीटक नष्ट करण्यासाठी आणि त्यांना जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी केली जाते. मात्र, कागदपत्रांमध्ये गडबड असल्याने अमेरिकन कस्टम अधिकाऱ्यांनी हा माल स्वीकारण्यास नकार दिला.America-Rejects-₹4Crore-IndianMangoes
निर्यातदारांचे मोठे नुकसान(America-Rejects-₹4Crore-IndianMangoes)
या आंब्यांची वाहतूक लॉस एंजेलिस, सॅन फ्रान्सिस्को आणि अटलांटा विमानतळांवर थांबवण्यात आली. निर्यातदारांच्या म्हणण्यानुसार, खरी समस्या कीटकांची नव्हती, तर त्या कीटकांना मारण्याच्या प्रक्रियेच्या कागदपत्रांची होती. ही प्रक्रिया ८ आणि ९ मे रोजी मुंबईत करण्यात आली होती, आणि ती अमेरिकेच्या कृषी विभागाच्या (USDA) अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली पार पडली होती.America-Rejects-₹4Crore-IndianMangoes
आंब्यांचे पुढे काय होणार?
अमेरिकन अधिकाऱ्यांनी दोन पर्याय दिले—आंबे नष्ट करणे किंवा भारतात परत पाठवणे. मात्र, आंबा लवकर खराब होणारा असल्याने आणि परत पाठवण्याचा खर्च खूप जास्त असल्याने, सर्व निर्यातदारांनी ते आंबे नष्ट करण्याचा निर्णय घेतला. यामुळे त्यांना सुमारे ४.२८ कोटी रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे.
भारतीय निर्यातदारांसाठी आव्हान
या घटनेमुळे भारतीय आंबा निर्यातदारांना मोठा फटका बसला आहे. अमेरिकेसारख्या मोठ्या बाजारपेठेत विश्वासार्हता टिकवून ठेवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर उभे राहिले आहे.
America Rejects ₹4 Crore Worth of Indian Mangoes, Exporters Face Huge Losses!
The United States has returned 15 shipments of Indian mangoes, with some even being destroyed. The total value of these shipments exceeds ₹4 crore.
Why Were the Mangoes Rejected?
American officials cited documentation errors related to radiation processing as the reason for rejecting the mangoes. This process is crucial for eliminating pests and ensuring the fruit remains fresh for longer. However, discrepancies in the paperwork led U.S. customs officials to refuse the shipments.
Major Loss for Indian Exporters
The mango consignments were halted at Los Angeles, San Francisco, and Atlanta airports. Exporters claim the issue was not with the fruit itself but with the certification of the radiation process. The treatment was conducted on May 8 and 9 in Mumbai, under the supervision of U.S. Department of Agriculture (USDA) officials.
What Happens to the Mangoes Now?
U.S. authorities provided two options—destroy the mangoes or send them back to India. Given the perishable nature of mangoes and the high cost of re-exporting, Indian exporters opted for destruction, resulting in a loss of approximately ₹4.28 crore.
Challenges for Indian Exporters
This incident has dealt a severe blow to Indian mango exporters, raising concerns about maintaining credibility in major markets like the U.S..