A-well-equipped-ambulance : माध्यम प्रतिनिधींना तातडीच्या प्रसंगी वैद्यकीय मदतीसाठी दोन सुसज्ज रुग्णवाहिका समर्पित
मुंबई :- समाज आणि देशाच्या व्यापक हितासाठी पत्रकार सातत्याने संवेदनशील, आव्हानात्मक आणि अनेकदा धोकादायक परिस्थितीत काम करत असतात. नैसर्गिक आपत्ती, अपघात, दंगली किंवा इतर संवेदनशील भागात वार्तांकन करताना कधी कधी तातडीच्या वैद्यकीय मदतीची आवश्यकता भासू शकते. अशा प्रसंगी त्वरित आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी माध्यम प्रतिनिधींसाठी समर्पित रुग्णवाहिका सेवा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. (A-well-equipped-ambulance)
मात्र कोणत्याही पत्रकार अथवा प्रतिनिधींवर ही रुग्णवाहिका वापरण्याची वेळ येऊ नये, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
विधान भवन प्रांगणात महाराष्ट्र टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन यांच्यासाठी दोन सुसज्ज ॲम्बुलन्सचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर,(Prakash Abitkar) परिवहन मंत्री प्रताप सरनाईक,(Pratap-Sarnaik) रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, (Bharat Gogave) आर बी जी फाऊंडेशनच्या अध्यक्षा मधुरा गेठे तसेच असोसिएशनचे अध्यक्ष उदय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या रुग्णवाहिका केवळ पत्रकारांसाठीच नव्हे तर गरज पडल्यास इतर रुग्णांनाही उपयोगी पडतील. त्यामुळे सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव अधिक दृढ होईल. समाजासाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
दैनंदिन घडामोडींचे वार्तांकन करणारे पत्रकार आणि कॅमेरामन यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आर बी जी फाऊंडेशन यांच्या पुढाकारातून आणि लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ यांच्या सहकार्याने या ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
यावेळी असोसिएशनचे महासचिव पंकज दळवी, कार्यकारिणी सदस्य मनश्री पाठक, (Manali Gaikwad) मनाली गायकवाड,(Manashree Pathak) राजेश साफळे, अनिल सौंदडे तसेच विधान भवनातील मीडिया प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेस आणि आरोग्य संरक्षणास बळकटी मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.