रूपेरी पटावरील लोककलेची साधक तारका निमाली

अभिनेत्री मधू कांबीकर : रूपेरी पटावरील लोककलेची साधक तारका निमाली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ अभिनेत्री  यांना श्रद्धांजली

मुंबई : महाराष्ट्राच्या लोककलेचा वारसा जतन करत रुपेरी पटावर अदाकारी आणि चतुरस्त्र अभिनयाने आपली ओळख निर्माण करणारी तारका निमाल्याची शोकभावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करताना व्यक्त केली आहे.

‘लोककला, रंगभूमी ते चित्रपट सृष्टी असा  यांचा कला प्रवास राहीला. लोककलेतील लावणीचा पारंपरिक बाज जपत त्यांनी कथ्थकच्या अभ्यासातून नृत्यांगना म्हणून लौकिक मिळविला. लावणीला आपल्या नृत्य शैलीने आणि नजाकतीने दिमाख मिळवून दिला. रुपेरी पडद्यावरही त्यांनी लावणीचे रूप आणखी खुलवून दाखविले.

त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत कसदार अभिनयाने अनेक वैविध्यपूर्ण भूमिका समर्थपणे साकार केल्या. कांबीकर यांचा कला प्रवास वैशिष्ट्यपूर्ण आणि या क्षेत्रातील दोन पिढ्यांसाठी मार्गदर्शक, प्रेरणादायी असा राहीला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री  यांचे निधन कला क्षेत्राची मोठी हानी असून, मराठी लोक कलेची पताका रुपेरी पडद्यावर दिमाखाने फडकत ठेवणारी चतुरस्त्र तारका निमाली आहे.

आम्ही कांबीकर कुटुंबीय आणि मधूताईंच्या चाहत्यांच्या दुःखात सहभागी असून या सर्वांना हा आघात सहन करण्याची शक्ती ईश्वराने शक्ती द्यावी अशी प्रार्थना करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ अभिनेत्री मधू  यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Social Media