महाराष्ट्रातून परिवर्तनाची सुरुवात होईल: डॉ. सिरिवेल्ला प्रसाद; काँग्रेसचा संघटन विस्तारावर भर

डॉ. सिरिवेल्ला प्रसाद महाराष्ट्र  : लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी देशात परिवर्तनाची गरज, परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातून होईल: डॉ. सिरिवेल्ला

मुंबई :  देशाची लोकशाही व संविधान संपवण्याची प्रक्रिया मागील काही वर्षापासून सुरु आहे. स्वायत्त संस्थांचे स्वातंत्र्य

संपुष्टात आणले आहे, निवडणूक आयोगाला भाजपाचे एजंट बनवले आहे, देशात चोरांचे राज्य आहे. मतचोरी,

सीटचोरी, आमदार खासदारांची चोरी, देशाची संपत्ती चोरी, तरुणांच्या नोकऱ्यांची चोरी, विद्यार्थ्यांच्या परीक्षा चोरी केल्या

जात आहेत. जे देशात होत आहे तेच महाराष्ट्रातही सुरु आहे. आता हे बदलण्याची वेळ आली असून लोकशाही व संविधान

रक्षणासाठी देशात परिवर्तनाची गरज आहे आणि या परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातून होईल, असा विश्वास नवनियुक्त

प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांनी व्यक्त केला आहे.

 

डॉ. सिरिवेल्ला प्रसाद महाराष्ट्र
काँग्रेसचे नवनियुक्त महाराष्ट्र प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांचे मुंबईत जल्लोषात स्वागत.

 

डॉ. सिरिवेल्ला प्रसाद महाराष्ट्र  : नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांचे मुंबईत जल्लोषात स्वागत

काँग्रेस प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांच्या पाच दिवसांच्या दौऱ्याची सुरुवात आज झाली. सकाळी मुंबई विमानतळावर

आगमन झाल्यानंतर त्यांनी शिवाजी पार्कवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले, त्यानंतर

चैत्यभूमीवर जाऊन संविधान निर्माते महामानव डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले व त्यानंतर त्यांचे

टिळक भवन येथे ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले.

टिळक भवन येथे डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांचा पदग्रहण सोहळा पार पडला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ,

विधीमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गट नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील,

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खासदार मुकुल वासनिक, रजनीताई पाटील, AICC चे सरचिटणीस

अविनाश पांडे, CWC सदस्य बाळासाहेब थोरात, नसीम खान, यशोमती ठाकूर, खा. प्रणिती शिंदे, खा. कल्याण काळे,

खा. प्रतिभा धानोरकर, माजी मंत्री विश्वजित कदम, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष

शिवराज मोरे, AICC सचिव U.B. व्यंकटेश, B.M. संदीप, रेहाना चिस्ती, सचिन सावंत, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व

प्रशासन ऍड. गणेश पाटील, वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस संदेश कोंडविलकर, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे,

गोपाल तिवारी यांच्यासह पदाधिकारी जिल्हाध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. प्रसाद यावेळी पुढे म्हणाले की, देशात कोणतीही घटना झाली तरी पंतप्रधान मोदी त्यावर काहीच बोलत नाहीत,

शेतकऱ्य़ांच्या आत्महत्या होत आहेत.दलित, अल्पसंख्याक, महिला यांच्यावर अत्याचार वाढले आहेत पण मोदी काहीच

बोलत नाहीत. महाराष्ट्रातही परिस्थिती वेगळी नाही. महाराष्ट्रातून उद्योग बाहेरच्या राज्यात जात आहेत, नोकऱ्या संपत

चालल्या आहेत तर बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. महाराष्ट्रात ६५ टक्के लोक भाजपा आरएसएस विरोधी विचाराचे आहेत.

शेतकरी, कष्टकरी, दलित, अल्पसंख्याक, तरुणवर्ग यांच्यासाठी काम करा, असे आवाहनही डॉ. प्रसाद यांनी केले आहे.

डॉ. सिरिवेल्ला प्रसाद महाराष्ट्र
काँग्रेसचे नवनियुक्त महाराष्ट्र प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांचे मुंबईत जल्लोषात स्वागत.

डॉ. सिरिवेल्ला प्रसाद महाराष्ट्र  :  आगामी वर्ष राज्यात संघटन विस्तारावर भर

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले की, यावर्षी संघटना विस्तारावर भर द्यायचा आहे, बुथ पातळीवर, ग्राम

पातळीवर, मंडळ स्तरावर काँग्रेसचा विस्तार झाला पाहिजे, यासाठी आपल्याला काम करायचे आहे, हे संघटना विस्ताराचे

काम ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करु असे सपकाळ म्हणाले. भाजपाला व मित्रपक्षांना हरवायचे आहे हे लक्ष्य ठेवून काम करा.

राज्यात सध्या भाजपा सरकारविरोधी वातावरण आहे. काँग्रेस पक्ष त्याविरोधात मोठा लढा देत आहे. पेपरफुटीच्या घटना

वाढल्या आहेत, या प्रश्नावर आक्रमकपणे काम सुरु आहे, एक मोठे जनआंदोलन राज्यात सुरु आहे. हा लढा सुरुच ठेवायचा

आहे पण राज्यात आज मोठा दुष्काळ पडला आहे. या संकटाच्या वेळी काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.

चारा छावण्या तत्काळ सुरु करा, पिण्याचे पाणी उपलब्ध करा, शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये मदत द्या, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक

शुल्क माफ करा, शेतमजुराला सिलेंडर मोफत द्या, अनुदान द्या यासह माजी प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या अभिनंदनाचा

ठरावही यावेळी मंजूर करण्यात आला.

डॉ. सिरिवेल्ला प्रसाद महाराष्ट्र
प्रसाद.ज्ञानेशकुमार हे मोदींचे प्यादे, माजी पंतप्रधानांवर केस चालते पण निवडणूक आयुक्तांवर केस चालवता येणार नसल्याचे मोदींकडून कायद्याचे अभय: खा. मुकुल वासनिक.

निवडणूक आयुक्तांवर केस चालवता येणार नसल्याचे मोदींकडून कायद्याचे अभय: खा. मुकुल वासनिक.

AICC चे सरचिटणीस मुकुल वासनिक यावेळी म्हणाले की, ज्ञानेशकुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती

करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायद्यात बदल केला. तीन सदस्यांच्या समितीतून सरन्यायाधीश यांना त्यांनी वगळले

व मनमानीपणे ज्ञानेशकुमार यांची नियुक्ती केली. ज्ञानेशकुमार हे नरेंद्र मोदी यांचे पाद्ये आहे. निवडणूक आयोगात भ्रष्ट कारभार

सुरु आहे पण निवडणूक आयुक्तांवर आयुष्यभर कोणत्याही कायद्याअतंर्गत कोणत्याही प्रकारची केस चालणार नाही असा

कायदा नरेंद्र मोदींनी बनवून त्यांना संरक्षण दिले आहे. या देशात माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव, डॉ. मनमोहनसिंह

यांच्यावर पदमुक्त झाल्यानंतर केस चालल्या पण निवडणूक आयुक्तांवर मात्र केस चालणार नाही, असे कायद्याचे अभय

पंतप्रधान मोदींनी दिलेले आहे. नरेंद्र मोदी संविधानाचे लचके तोडण्याचे काम करत आहेत, याविरोधात काँग्रेस पक्ष व राहुल

गांधी यांच्या नेतृत्वाखाली मोठा संघर्ष सुरु आहे, असेही वासनिक म्हणाले.

विजय वडेट्टीवार
डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांचा महाराष्ट्र दौरा सुरू; शिवाजी पार्क, चैत्यभूमीवर अभिवादन, काँग्रेसकडून मोठी तयारी

डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांचा महाराष्ट्र दौरा सुरू; शिवाजी पार्क, चैत्यभूमीवर अभिवादन, काँग्रेसकडून मोठी तयारी

यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले की, राहुल गांधी हे मोदी शाहच्या हुकूमशाही विरोधात मोठ्या हिमतीने संघर्ष करत आहेत,

त्यामुळे भाजपाची अवस्था बिकट बनली आहे. भाजपा मतचोरी करून विजयी झाले आहे. ज्ञानेशकुमार हे भाजपाचे एजंट

बनून काम करत आहेत हे लोकशाहीवरचे मोठे संकट आहे. राहुल गांधी यांच्या संघर्षाला जनतेचा पाठिंबा मिळत असून

२०२९ मध्ये सत्तापरिवर्तन होईल अशी आशा वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. राज्यात मोठा दुष्काळ पडला आहे, हे मोठे संकट

आहे या संकटावेळी मदत म्हणून आमदारकीचे एक वर्षाचे मानधन दुष्काळग्रस्तांसाठी देत असल्याची घोषणा त्यांनी केली.

देशाची लोकशाही व संविधान वाचवण्याची मोठी लढाई

ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, देशाची लोकशाही व संविधान वाचवण्याची मोठी लढाई आपल्या लढावी

लागत आहे, तर दुसरीकडे राज्यात आज दुष्काळाचे मोठे संकट आहे, या संकटात काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी

खंबीरपणे उभा राहिला पाहिजे. संघर्ष मोठा आहे पण शेवटी आपल्या संघर्षाला यश येणार आहे. २०२९ साली परिवर्तन

होईल व केंद्रात व राज्यात काँग्रेसचे सरकार येईल असे थोरात म्हणाले.

महाराष्ट्र हे काँग्रेस विचाराचे राज्य आहे व यापुढेही काँग्रेस विचाराचेच राहिल

माजी मंत्री नसीम खान यावेळी म्हणाले की, महाराष्ट्र हे काँग्रेस विचाराचे राज्य आहे व यापुढेही काँग्रेस विचाराचेच राहिल.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीला मोठे यश मिळाले पण चार महिन्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत

मात्र मतचोरी झाली व त्याचा फायदा भाजपाला मिळाला. निवडणूक आयोग भाजपाचा कार्यकर्ता म्हणून काम करत आहे,

मोदींच्या इशाऱ्यावर निवडणूक आयोग लोकशाही कमजोर करण्याचे काम करत आहेत असेही म्हणाले.

यावेळी इतर मान्यवरांनाही नवनियुक्त प्रभारी डॉ. प्रसाद यांचे स्वागत केले.

Social Media