Heathrow Cyber Attack Flights : लंडनच्या हिथ्रो विमानतळावर सायबर हल्ला झाल्याने
1200 विमानांचे मार्ग बदलले; पुरस्कारासाठी गेलेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या 6 अधिकाऱ्यांना स्वित्झर्लंडमध्ये
थांबावे लागले.
लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका: कॉमनवेल्थलीडरशिप(Heathrow Cyber Attack Flights)
लंडनच्या हिथ्रो विमानतळावर झालेल्या संशयित सायबर हल्ल्यामुळे तब्बल 10 ते 12 तास उड्डाणे
विलंबित झाली असून जवळपास 1200 फ्लाईट्स डायव्हर्ट करण्यात आल्या आहेत.
या गोंधळाचा फटका महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना
बसला आहे. शिंदे यांचे ओएसडी आणि फोटोग्राफर यांचे विमान हिथ्रोऐवजी झ्युरिकला वळवण्यात
आले असून तेथे सहा अधिकारी अडकले आहेत.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ब्रिटिश एअरवेजच्या विमानाने वेळेत लंडनला पोहोचले आहेत.
सध्या लंडनमध्ये सायंकाळी 5 वाजले असून पहाटे सात वाजता झ्युरिकमध्ये अडकलेल्या अधिकाऱ्यांना
लंडनला नेण्याची व्यवस्था केली जात आहे.
शिंदे यांच्या लोककल्याणकारी योजनांची आणि उल्लेखनीय कार्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली
जात असून ब्रिटनच्या संसदेत 9 आणि 10 सप्टेंबर रोजी दोन महत्त्वपूर्ण कार्यक्रमांमध्ये त्यांना विशेष
निमंत्रण देण्यात आले आहे. या दौऱ्यात त्यांना तीन प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे.
- हाऊस ऑफ लॉर्ड्स येथे ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’
- हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये ‘इंटरनॅशनल कॉन्क्लेव्ह 2026’ दरम्यान ‘स्टेटस्मनशिप अवॉर्ड’
- महाराष्ट्र मंडळ, यूके तर्फे ‘ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र’
यूके एशियन बिझनेस कौन्सिल आणि ‘कॅनव्हास फॉर केअर क्रिएटिव्ह आर्ट कॅम्पस’ यांच्या संयुक्त
विद्यमाने हा सन्मान सोहळा पार पडणार आहे. उत्तर आयर्लंडच्या माजी फर्स्ट मिनिस्टर बॅरोनेस
आर्लेन फॉस्टर आणि कौन्सिलचे चेअरमन अँड्र्यू ग्रोकॉक यांच्या वतीने उपाध्यक्ष सुदीप सकाळे
यांनी शिंदे यांना निमंत्रण दिले आहे.
हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ सोहळा
उपमुख्यमंत्री एकनाथ मंगळवारी रात्री लंडनला रवाना झाले. तेथे 9 सप्टेंबर 2026 रोजी हाऊस
ऑफ लॉर्ड्समध्ये ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ सोहळ्यात सहभागी होतील.
संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात, शिंदे यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून
केलेल्या नागरिक-केंद्री, पारदर्शक आणि नाविन्यपूर्ण प्रशासनासाठी सन्मानित केले जाईल.
कौन्सिलचे चेअरमन अँड्र्यू ग्रोकॉक यांच्या वतीने कौन्सिलचे उपाध्यक्ष सुदीप सकाळे यांनी त्यांना
निमंत्रण दिले आहे.
नागरिक-केंद्री, पारदर्शक आणि नाविन्यपूर्ण प्रशासन पद्धतीसाठी शिंदे यांना हा बहुमान मिळत असून महाराष्ट्राच्या नेतृत्वाचा डंका आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही उमटत आहे.
संदर्भ : Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान