Dhamal-4: पहिल्याच दिवशी ‘वेलकम टू जंगल’ आणि ‘अल्फा’ला टक्कर देत ‘धमाल 4’ने किती कमाई केली?

Dhamal-4 : अजय देवगणचा ‘धमाल 4’ हा कॉमेडी चित्रपट फारसा प्रचार नसतानाही बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी हिट ठरला आहे. अक्षय कुमारच्या (Akshay-Kumar) ‘वेलकम टू द जंगल'(Welcome-to the-jungle)  आणि आलिया भट्टच्या (Alia-Bhatt) ‘अल्फा’ (Alpha) सारख्या चित्रपटांशी स्पर्धा करत ‘धमाल 4’ने प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळवला आहे.

बॉक्स ऑफिसवर किती कमाई? (Dhamal-4)

इंद्र कुमार(Indra-Kumar) दिग्दर्शित ‘धमाल 4’ ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. Sacnilk च्या अहवालानुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतात 13.75 कोटी रुपये आणि परदेशात 5 कोटी रुपये असे जगभरात एकूण 21.50 कोटी रुपये कमावले. दुसऱ्या दिवशी कमाईत 60.7% वाढ झाली असून, भारतातील एकूण नेट कमाई 36.50 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

‘वेलकम 3’ आणि ‘अल्फा’वर परिणाम

‘धमाल 4’ प्रदर्शित झाल्यानंतर इतर चित्रपटांच्या कमाईवर परिणाम झाला. गुरुवारी 2 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या ‘वेलकम टू द जंगल’ची कमाई शुक्रवारी 1 कोटी रुपयांपर्यंत घसरली, तर आलिया भट्टच्या (Alia-Bhatt) ‘अल्फा’ने प्रदर्शनाच्या आठव्या दिवशी 1.65 कोटी रुपये कमावले. कॉमेडी, लोकप्रिय कलाकार आणि ‘धमाल’ फ्रँचायझीमुळे ‘धमाल 4’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली आहे.

‘धमाल 4’ने अजय देवगणच्या (Ajay Devgan) यावर्षीच्या ‘दे दे प्यार दे 2’ला मागे टाकले आहे. ‘दे दे प्यार दे 2’ने दुसऱ्या दिवशी 12.25 कोटी रुपये (नेट) कमावले होते, तर दोन दिवसांचे एकूण कलेक्शन 21 कोटी रुपये होते. याव्यतिरिक्त, ‘धमाल 4’ने ‘सन ऑफ सरदार 2’ (‘Son of Sardar 2’) पेक्षाही चांगली कामगिरी केली आहे. ‘सन ऑफ सरदार 2’ (‘Son of Sardar 2’) ने दुसऱ्या दिवशी 8.25 कोटी रुपये (नेट) कमावले होते, तर दोन दिवसांचे एकूण कलेक्शन 15.50 कोटी रुपये होते.

‘टोटल धमाल’चा विक्रम अजूनही दूरच

‘धमाल 4’ समोर ‘टोटल धमाल’ (2019) चित्रपटाने निर्माण केलेले आव्हान आहे, ज्याने दुसऱ्याच दिवशी 20.40 कोटींची कमाई केली होती आणि एकूण 155.67 कोटींचा गल्ला जमवला होता. ‘धमाल 4’ च्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईत वाढ झाली असली तरी, ‘टोटल धमाल’चा विक्रम गाठणे अजून दूर आहे. हा चित्रपट ‘टोटल धमाल’ (‘Total-Dhamaal’) चा सिक्वेल आहे.

अजय देवगण,(Ajay Devgan) अरशद वारसी,(Arshad-Warsi) रितेश देशमुख,(Ritesh Deshmukh,) जावेद जाफरी,(Javed Jaffrey,) रवी किशन,(Ravi-Kishan) संजय मिश्रा,(Sanjay-Mishra, )उपेंद्र लिमये,(Upendra-Limaye,) अंजली आनंद,(Anjali-Anand, ) संजीदा शेख,(Sanjeeda-Sheikh) ईशा गुप्ता(Esha-Gupta) आणि विजय पाटकर(Vijay-Patkar) यांसारखे कलाकार यात प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटाचे बजेट सुमारे 200 कोटी रुपये आहे.

Social Media