तुकाराम मुंढे म्हणाले, “माझी बदली झाल्यावर मुलगा दोन प्रश्न विचारतो.”

Tukaram-Mundhe : बदली झाल्यावर त्रास होतो का? तर होय होतो पण मी त्याचा गवगवा करत नाही. आपल्याला आपलं काम करायचं आहे हे माझ्यासमोर असतं असंही तुकाराम मुंढेंनी म्हटलं आहे.

राज्याचे कर्तव्यदक्ष अन्न व औषध (Food-and-Medicine)प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्नभेसळ करणाऱ्या माफियांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. अनेकदा बदली होऊनही, ‘माझ्या कुटुंबाला त्रास होतो, पण मी कर्तव्याला प्राधान्य देतो,’ असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले.

तुकाराम मुंढे काय म्हणाले? (Tukaram-Mundhe)

तुकाराम मुंढे(Tukaram-Mundhe) यांनी दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्यांच्या पत्नीने त्यांना शिकवले आहे की, आपल्या गरजा कमी असल्यामुळे सोबत तेवढेच घ्यावे जे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांची बॅग(Bag) नेहमी भरलेली नसते. तसेच, त्यांनी हेही सांगितले की त्यांचा मुलगा त्यांना बदली झाल्यावर दोन प्रश्न विचारतो, कारण त्याला मित्र नाहीत.

बदली झाल्यावर त्रास नक्कीच होतो, पण..

माझ्या अनेकदा झालेल्या बदल्यांमुळे मुलाला शाळा बदलाव्या लागल्या, ज्यामुळे त्याला मित्र बनवता आले नाहीत. याचा कुटुंबावर, विशेषतः मुलावर, परिणाम होतो हे मी जाणतो. कुटुंबाने मला नेहमीच पाठिंबा दिला आहे आणि बदलीच्या परिणामांची जबाबदारी कुटुंबप्रमुख म्हणून माझी आहे. मी माणूस असल्याने मलाही भावना आहेत, पण कर्तव्याला प्राधान्य देत मी पुढे जात राहतो.

माझी बदली झाली की मुलगा दोन प्रश्न विचारतो.

तुकाराम मुंढेंनी सांगितले की, मुलाच्या पाचवीपर्यंत सहा शाळा बदलल्या गेल्या. मुंबई,(Mumbai,) सोलापूर,(Solapur,) पुणे,(pune) नाशिक (nashik)असा प्रवास करत पुन्हा मुंबईत आल्याने त्याला मित्र जोडता आले नाहीत. बदली झाल्यावर मुलगा “तुमच्याबरोबर यायचं आहे का? शाळा बदलणार का?” असे प्रश्न विचारतो. ही कठीण परिस्थिती असली तरी, पब्लिक सर्व्हंट (Public-Servant) म्हणून आपली भूमिका पार पाडणे हे आपले दायित्व आहे. त्यामुळे त्यांना सहानुभूती नको आहे.

तुकाराम मुंढेंची आत्तापर्यंत कितीवेळा बदली झालीये?
१) ऑगस्ट २००५ – प्रशिक्षणार्थी, उपजिल्हाधिकारी सोलापूर
२)सप्टेंबर २००७ – उप जिल्हाधिकारी, देगलूर उपविभाग
३) जानेवारी २००८ – सीईओ, जिल्हा परिषद नागपूर
४) मार्च २००९ – आयुक्त, आदिवासी विभाग
५) जुलै २००९ – सीईओ, वाशिम
६) जून २०१० – सीईओ, कल्याण<br>७) जून २०११ – जिल्हाधिकारी, जालना<br>८) सप्टेंबर २०१२ – विक्रीकर सहआयुक्त मुंबई
९) नोव्हेंबर २०१४ – सोलापूर जिल्हाधिकारी
१०) मे २०१६ – आयुक्त, नवी मुंबई महापालिका

११) मार्च २०१७ – मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपीएल, पुणे
१२) फेब्रुवारी २०१८ – आयुक्त, नाशिक महापालिका
१३) नोव्हेंबर २०१८ – सहसचिव, नियोजन
१४) डिसेंबर २०१८ -प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई
१५) जानेवारी २०२० – आयुक्त, नागपूर महापालिका
१६) ऑगस्ट २०२० – सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई
१७) जानेवारी २०२१ – राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत
१८) सप्टेंबर २०२२ – आयुक्‍त आरोग्‍य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान
१९) जुलै २०२३ – पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभाग
२०) जून २०२४ – विकास आयुक्त (असंघटित कामगार)
२१) ऑगस्ट २०२५: सचिव, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, मंत्रालय
२२) मे २०२६: आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

Social Media