Peddy : नेटफ्लिक्सवर ३ तास ७ मिनिटांचा जबरदस्त ॲक्शन थ्रिलरचा धुमाकूळ

Peddy : नेटफ्लिक्सवर ३ तास ७ मिनिटांचा जबरदस्त ॲक्शन थ्रिलर (Action-thriller)धुमाकूळ घालत आहे. प्रदर्शित झाल्याच्या २४ तासांत तो नंबर-१ वर ट्रेंड करत असून, बॉक्स ऑफिसवरही(Box-Office) त्याने ३०० कोटींहून अधिक कमाई केली आहे.

विकेंडला स्पोर्ट्स-ॲक्शन (Sports-action)ड्रामा चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल, तर नेटफ्लिक्सवर नुकताच प्रदर्शित झालेला आणि थिएटरमध्ये गाजलेला हा चित्रपट तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. रिलीज होताच अवघ्या 24 तासांत या चित्रपटाने नेटफ्लिक्सच्या टॉप ट्रेंडिंग यादीत पहिले स्थान पटकावले आहे.

पेड्डीची दमदार एन्ट्री (Peddy)

बुची बाबू सना दिग्दर्शित स्पोर्ट्स-ॲक्शन (Sports-action)ड्रामा ‘पेड्डी’ 4 जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. राम चरण(Ram Charan), जान्हवी कपूर(Janhvi Kapoor), दिव्येंदू शर्मा,(Divyendu-Sharma) शिव राजकुमार,(Shiv-Rajkumar,)जगपती बाबू(Jagapati Babu) आणि बोमन इराणी(Boman-Irani) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या 3 तास 7 मिनिटांच्या चित्रपटात ॲक्शन, स्पोर्ट्स, ड्रामा आणि राजकारण यांचा थरार आहे.

बॉक्स ऑफिसवर 300 कोटींहून अधिक कमाई

‘पेड्डी’ने प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. तेलुगू प्रेक्षकांचा या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळाला, ज्यामुळे जगभरात या चित्रपटाने 333 कोटी रुपयांची कमाई केली. हिंदीत अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नसले तरी, परदेशात चांगली कमाई करत हा चित्रपट यशस्वी ठरला..

‘पेड्डी’ची कथा

चित्रपटाची कथा एका छोट्या गावात राहणाऱ्या मजुराभोवती फिरते. तो दिवसभर मजुरी करतो, पण त्याच्याकडे क्रिकेट आणि कुस्ती या दोन्ही खेळांचं अफाट कौशल्य असतं. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर तो केवळ स्वतःचं आयुष्य बदलण्याचा प्रयत्न करत नाही, तर आपल्या गावालाही अधिकृत ओळख आणि रेल्वे स्टेशन मिळवून देण्यासाठी भ्रष्ट राजकारणाविरोधात लढा उभा करतो.स्पोर्ट्स, संघर्ष, भावना आणि प्रेरणा यांचा सुंदर संगम या चित्रपटात पाहायला मिळतो.

‘पेड्डी'(Peddy) हा चित्रपट 9 जुलै रोजी नेटफ्लिक्सवर(Netflix)प्रदर्शित झाला आणि एका दिवसातच तो नेटफ्लिक्सच्या टॉप 10 ट्रेंडिंग यादीत पहिल्या स्थानावर पोहोचला. विकेंडला एक चांगला स्पोर्ट्स-ड्रामा पहायचा असल्यास, ‘पेड्डी’ हा एक उत्तम पर्याय आहे.

Social Media