३० जूनपर्यंत HSRP नंबर प्लेट बसवा; १ जुलैपासून नियमभंग करणाऱ्यांवर पोलिस आणि परिवहन अधिकाऱ्यांकडून कडक कारवाई

HSRP-number-plate : ३० जूनपर्यंत HSRP नंबर प्लेट बसवा; १ जुलैपासून नियमभंग करणाऱ्यांवर पोलिस आणि परिवहन अधिकाऱ्यांकडून कडक कारवाई

मुंबई : राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP) बसविण्यासाठी ३० जून २०२६ ही अंतिम मुदत असून, त्यानंतर १ जुलैपासून नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच HSRP न बसविलेल्या वाहनांची आरटीओमधील (RTO)  अनेक महत्त्वाची कामेही रोखण्यात येणार आहेत. (HSRP-number-plate)

HSRP नंबर प्लेट न बसविणाऱ्या वाहनधारकांना वाहन हस्तांतरण, पत्ता बदल, कर्जबोजा चढविणे किंवा उतरविणे, वाहनाची पुनर्नोंदणी, वाहनातील बदल तसेच परवाना नूतनीकरण यांसारख्या आरटीओमधील (RTO) सेवा उपलब्ध होणार नाहीत. मात्र, वाहनाच्या फिटनेस प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी ही अट लागू राहणार नाही.

Social Media