राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांचा वाढत्या महागाईबाबत केंद्र सरकारला टोला

Manmohan-Singh : आकडे, आर्थिक मांडणी करत केले देशाच्या आर्थिक परिस्थितीचे विश्लेषण

नवी मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार(Sharadchandra-Pawar) पक्षाच्या वतीने आज वाशी सिडको एक्सिबिशन सेंटर येथे वाढत्या महागाईबाबत आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनाच्या सांगते नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांच्या एकत्रित पत्रकार परिषद घेतली. रामचंद्र कह गए सिया से , ऐसा कलयुग आएगा, गाडी खरीदो गे कॅश से , और पेट्रोल लोन से आएगा” असं म्हणत वाढत्या महागाईबाबत पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांनी केंद्र सरकारला टोला लगावला

जयंतराव पाटील(Jayantrao-Patil) पुढे म्हणाले की, २०१४ला मनमोहन सिंग यांचे सरकार गेले. त्याचे प्रमुख कारण काय की आम्ही सत्तेत आलो तर सगळं स्वस्त करू अशी घोषणा सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आली. पण आज काय परिस्थिती आहे तर सकाळी उठलं की पेट्रोल, डिझेल, गॅस, सीएनजी, सोनं सगळ्यांचेच भाव वाढत आहेत. जे पेट्रोल २०१४ साली ७१.५० रुपये होतं ते आज १११ रुपये झालं, डिझेल ५२ रुपये होते ते आज ९७ रुपये झाले आहे. आता १२ रुपये अजून वाढणार असल्याची बातमी आहे.

हॉटेल व्यासायिकांना परवडेल का? (Manmohan-Singh)

यांना काही विचारलं की म्हणतात पाकिस्तान, बांगलादेश मध्ये आपल्यापेक्षा महाग आहे. परिस्थिती पहिली तर त्यांचच्या इथे दर आपल्यापेक्षा वधारले आहे. आपले चलन खाली का जाते आहे याचे स्पष्टीकरण सरकारने द्यावे. पाकिस्तानचे ४५० रुपये म्हणजे आपले १५३ रुपये. २०२४ साली १ रुपया म्हणजे ३.३५ पाकिस्तान रुपया तर २०२६ मध्ये १ रुपया म्हणजे २.८८ पाकिस्तान रुपया. २०२० साली कोविड होते तेव्हा १९ डॉलर प्रति बॅरल होता.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाचा दर प्रति बॅरल कमी असताना देखील सरकारने लोकांकडून अधिकचे पैसे काढण्याचे काम केले असा आरोप करत असतानाच त्यांनी २०१४ आधी देशातील एक बाबा म्हणत होते की देशात बदल घडला की पेट्रोल ३०-३५ रुपयांमध्ये मिळेल आज ते कुठे आहेत? असा सवाल उपस्थित करत त्यांनी चिमटा काढला.

मागील ५ महिन्यात commercial सिलेंडर च्या दरांमध्ये १५०० रुपयांनी वाढ केली. हॉटेल व्यासायिकांना परवडेल का? घरगुती गॅसचे दर ४०० होता आज १०००च्या पार गेला आहे. आपण काय करतोय याचे भान सरकारला राहिलेले नाही. मनमोहन सिंग यांनी २००८ साली जेव्हा देशावर संकट आले त्यावेळी सर्व उपाययोजना केल्या मात्र जनतेला त्याची तोशीस लागू दिली नाही. देशाने सव्वा दोनशे लाख कोटी रुपयांचे कर्ज काढले आहे. विदेशी बँकेमधून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीची जबाबदारी आहे.

पाकिस्तान, बांगलादेश मध्ये आपल्यापेक्षा महाग

लोकांकडून पैसे वसूल करण्यासाठी कर वाढवण्याचे काम सरकार करते आहे. मी राज्य सरकारला विनंती केली तुम्ही कर रद्द करा. इंधनाचे दर कमी होतील. पण सरकार तसे करताना दिसत नाही. उलट थोड्या दिवसांनी रुपयाची शंभरी पार होईल. तेव्हा आम्ही सेलिब्रेशन करू, जेणेकरून आम्हाला अटक होणार नाही असं त्यांनी नेहमीच्या शैलीत सांगितले.‌ ब्लूमबर्गचा एक रिपोर्ट आहे.

रुपयाचे अवमूल्यन थांबवण्यासाठी सरकारने देशाचे सोने विकले आहे. सरकारने याचा खुलासा करावा. खताचे मोठे संकट येणार आहे त्यावर सरकारने काही मार्ग काढला आहे का? व्हिएतनाम सारख्या लहान देशाचा एक्सपोर्ट भारतापेक्षा जास्त झालेला आहे. उत्पादनांमध्ये आपण विश्वगुरु होऊ शकलो नाही १२ वर्षात ही आपली कर्तबगारी आहे. १२ वर्षांपूर्वी देशाला अच्छे दिन आनेवाले है असा प्रवास बुरे दिन आनेवाले है इथवर येऊन पोहचला आहे अशी शोकांतिका त्यांनी बोलून दाखवली.

Social Media